बीड जिल्ह्यात लॉकडाऊन कालावधीत ३० सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत वाढ–जिल्हाधिकारी राहुल रेखावार
बीड : राज्य शासनाचे आदेशानुसार जिल्ह्यात काही नवीन बाबींना अटी नियमानुसार परवानगी देण्यात आली आहे तर काही बाबींना मनाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात दिनांक ३० सप्टेंबर २०२० रोजी रात्री १२ वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४(१) (३) अन्वये मनाई व जमावबंदी आदेश लागू करण्यात आले असून आज जे आदेश लागू आहेत ते आदेश ३० सप्टेंबर २०२० पर्यंत लागू राहतील असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
बीड जिल्हा कार्यक्षेत्रात पुढील बाबींना मनाई
सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, कोथिंग इन्स्टिट्यूट या बंद राहतील. तथापि ऑनलाईन, दुरस्थ शिक्षणास परवानगी राहील.
चित्रपत्रगृहे, जलतरण तलाव, करमणूक उद्याने, थिएटर मॉल्स व मार्केट कॉम्प्लेक्समधील सह) बार, सभागृहे व यासारख्या इतर सर्व जागा बंद राहतील.
सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर मेळावे तसेच मोठ्या संख्येने लोक जमा होणारे कार्यक्रम, परिषदा बंद राहतील.
वय वर्ष ६५ वरील व्यक्ती, अनेक गंभीर आजार असणारे व्यक्ती (Comorbici), गर्भवती महिला, १० वर्ष खालील मुले यांनी अत्यावश्यक सेवा व वैद्यकिय सेवा वगळता इतर कारणास्तव बाहेर पडू नये.
बीड जिल्हा कार्यक्षेत्रातील खालील बाबींना परवानगी
दिनांक २ सप्टेंबर २०२० पासून सर्व हॉटेल व लॉजिंग यांना चालू ठेवण्यास परवानगी देत आहे. तथापि, शासनाने निर्धारित केलेली आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील.
दिनांक २ सप्टेंबर २०२० पासून व्यक्ती व वस्तू यांना आंतरजिल्हा हालचालीवर कोणतेही बंधन नाही. यासाठी वाहने आणि त्यातून प्रवास करणाऱ्या व्यक्तीसाठी स्वतंत्र परवानगी मान्यता/ई-परवान्याची आवश्यकता नाही.
खुल्या जागेत व्यायाम आदी (Outdear Physical Activities) करणेस कोणतेही बंधन असणार नाही.
सर्व मार्केट, दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यत या वेळेत चालू राहतील.
तथापि, मेडीकल, औषधांची दुकाने पुर्णवेळ चालू ठेवण्यास परवानगी राहील. जर पाच पेक्षा जास्त व्यक्ती दुकानात आल्यास अथवा सामाजिक अंतराचे पालन न केल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल,
सर्व खाजगी कार्यालये त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे केवळ ३०% कर्मचा-यांसह काम करतील. सर्व कर्मचारी कोविड विषयक सर्व नियमांचे पालन करतील. याची जबाबदारी पुर्णपणे संस्था चालकांची, मालकांची असेल. याविषयी शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन (SOP)करावे.
सार्वजनिक व खाजगी वाहतुकीतील लोकांच्या प्रवासासाठी पुढीलप्रमाणे परवानगी
१.टॅक्सी , कॅब व ॲग्रीगेटर यांना फक्त अत्यावश्यक बाबींसाठी १+३ व्यक्तींसाठी प्रवासास परवानगी तसेच
२.रिक्षा:- फक्त अत्यावश्यक बाबींसाठी १+२ व्यक्ती
३. चार चाकी :- फक्त अत्यावश्यक बाबींसाठी १+३ व्यक्ती
४. दोन चाकी:-१+१व्यक्ती मास्क व हेल्मेटसह
प्रवास करताना मास्कचा वापर करणे बंधकारक आहे.
दिनांक २ सप्टेंबर २०२० पासून खाजगी बस, मिनी बस व इतर यंत्रणेद्वारे प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी राहील. तथापि, त्याकरीता परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी निर्देशित केलेल्या आदर्श कार्य प्रणाली (ISOP) चे पालन करणे बंधनकारक राहील.
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिंबधात्मक कायदा 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करून खंड 2,3 व4 मधील तरतुदीनूसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे.आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रधिकरणाची स्थापना करण्यात आलेलीआहे व त्यातील पोट कलम 2 (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडधिकारी हे या प्रधिकरणाचे अध्यक्ष आहेत.
बीड जिल्हयात यापूर्वीच्या आदेशात वाढ करुन फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम 144(1)(3) अन्वये दिनांक 30 सप्टेंबर 2020 रोजीचे रात्री12 वाजैपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहे.