बीड जिल्ह्यात एकही रूग्ण नसताना ग्रीन झोनमध्ये का येत नाही…?
परळी : आपल्या सगळ्यांना एक प्रश्न असा पडला असेल की आपल्या बीड जिल्ह्यात करोनाचा एकही रुग्ण नसताना आपण orange झोन मध्ये कसे काय ?
आपण ग्रीन झोनमध्ये कसे येत नाहीत ?
याबाबत शासकीय स्तरावर आमच्या प्रतिनिधी ने माहिती काढली असताना अशी बाब पुढे आली की
आपल्याकडे जो पेशंट सापडला होता तो 21 एप्रिल रोजी निगेटिव्ह झाला. त्या नंतर 14 दिवस थांबावे लागते. ज्या वेळी झोन जाहीर झाले त्यावेळी 14 दिवस पूर्ण झालेले नसल्याने आपण ऑरेंज झोनमध्ये गेलो आहोत हे 14 दिवस पाच मे रोजी पूर्ण होतात तोपर्यंत आपल्या जिल्ह्यात एकही रुग्ण नव्याने आढळून आला नाही तर त्यानंतर जेव्हा झोन ची पुनर्रचना होईल तेव्हा आपण ग्रीन झोन मध्ये जाऊ आजपर्यंत आपल्या सर्वांनी लॉक डाउनला दिलेली साथ पाळलेले नियम व अटी आणि प्रशासनाची अखंड मेहनत यामुळे आपण सर्वजण सुरक्षित आहोत
या पुढील काळातही आपल्याला कायम ग्रीन झोन मध्ये रहायचे असून त्यासाठी सर्वांनी असेच सहकार्य केले पाहिजे घरातच आणि सुरक्षित राहिले पाहिजे.