बीड जिल्हा जमियत ए उलेमा ची पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तातडीची बैठक!

बीड /प्रतिनिधी : राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला पावसाचा जोरदार फटका बसला असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी दरड कोसळून नागरिकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. राज्यभर महाभयंकर संकट आले असल्याने संकटात सापडलेल्या लोकांना मदत करण्यासाठी आज शासकीय विश्रामगृह बीड येथे जमियत ए उलेमा हिंद बीड जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीत पूरग्रस्तांसाठी गहू तांदूळ डाळ यासह जीवनावश्यक वस्तू व रोख रक्कमेची मदत करण्याचे आवाहन जमियत तर्फे करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष मुफ्ती अब्दुल्ला कासमी,मो. साबीर रशिदी,मुफ्ती अन्वर नोमानी, मो. वसीम कासमी, हाफिज शब्बीर केज,मो.कारी साद माजलगाव, शोएब सर, हाफिज सरताज, असद भाई धारूर, मो. इक्बाल कुरेशी, जेडी शाह गेवराई, खमर भाई,मुफ्ती उसामा नेकनुर, इत्यादी जमियत ए उलेमा हिंद महमूद मदनी चे पदाधिकारी उपस्थित होते त
याप्रसंगी बीड जिल्ह्यातून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचे आव्हान करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *