बीड जिल्हयात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला; प्रशासनाचे दुर्लक्ष कन्हेरवाडी गावात बाहेरगावाहुन आलेल्या नागरिकांची कोरोना तपासणी घ्या – राजेभाऊ फड
परळी : कन्हेरवाडी गावातील कामानिमित्त,व्यवसाय,शिक्षणाच्या निमित्त मुंबई,पुणे,औरंगाबाद,येथे गेलेले बरेच नागरिक आता मोठया संख्येने रेड झोनमधुन गावात आलेले आहेत.काही जण येताना वैद्यकीय तपासणी करून आलेले आहेत तर काही जण वैद्यकीय तपासणी करून आलेले नाहीत गावात आल्यानंतर त्यांना ग्रामपंचायत कडुन तालुक्याच्या ठीकाणी जावुन तपासणी करून या असे सांगितले जाते,तेथे गेले तर फक्त नाव नोंदणी करून हातावर शिक्का मारला जात आहे आणि घरी क्वारंटाईन व्हा असे सांगितले जात आहे.जर प्रवासादरम्यानच्या काळात ते नागरिक कोरोना संक्रमित झालेले असतील तर त्याला जबाबदार कोण ? दि.०८/०५/२०२० ते दि.१८/०५/२०२० या कालावधित एकुण ५५ नागरिक रेड झोन असलेल्या शहरामधुन गावात दाखल झाले आहेत.गावात किंवा तालुक्याच्या ठीकाणी त्यांची कोरोना वैद्यकीय तपासणीची सोय नाही त्यामुळे कोण पॉझिटीव्ह आहे की नाही याबाबत कळायला मार्ग नाही.त्यामुळे गावातील प्रत्येक नागरिक कोरोनाच्या प्रचंड दहशतीखाली आहे आम्हीही कोरोना संक्रमित होतो की काय या भितीपोटी नागरिक जगत आहेत बाहेर गावावरून गावात आलेल्या प्रत्येक नागरिकाची कोरोना तपासणी केली.तसेच योग्य वेळी निदान केले.तर कोरोना विषणुचे संक्रमण होणार नाही.
ग्रामपंचायत कार्यालयाकडुन दोन वेळा जंतु नाशक फवारणी केलेली आहे.गावात ऍन्टी कोरोना फोर्स कार्यरत आहे सर्व गावकरी,ग्रामपंचायत कर्मचारी,अशा वर्कर्स,अंगणवाडीताई,सिस्टर,ग्रामविकास अधिकारी,तलाठी आम्ही सर्वजण आम्ही सर्व जण बाहेर गावाहुन येणार्या नागरिकांवर लक्ष ठेवुन आहोत ग्रामविकास अधिकारी त्यांच्या नावाची ऑनलाईन नोेंद करीत आहेत.कोरोना विषाणुचा फैलाव होवु नये यासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रयत्न् ा चालु आहेत.बाहेर गावाहुन आलेल्या व्यक्तींना १४ दिवस घराबाहेर येवु नये तसेच कोणाशी संपर्क करू नये म्हणुन तिन चार वेळेस गावात दौंडी दिली आहे.त्यांना प्रत्यक्ष भेटुन फोनवरून कल्पना दिलेली आहे.परंतु बाहेरगावाहुन आलेल्या नागरिक कोरोनासंक्रमित आहेका नाही हे आम्ही कोणीच सांगु शकत नाही म्हणुन बाहेर गावाहुन आलेल्या प्रत्येक नागरिकाची कोरोना टेस्ट करणे अत्यंत गरजेचे आहे.जर रेडझोनमधुन आलेल्या एकाही नागरिकाला कोरोनाचे संक्रमण झाले तर सर्व गावाला त्याचे परिणाम भोगावे लागतील व प्रशासनाला ही त्रास होईल म्हणुन बाहेर गावाहुन गावात आलेल्या सर्व व्यक्तीची कोरोना टेस्ट करावी असे निवेदन कन्हेरवाडी गावचे सरपंच राजेभाऊ फड यांनी प्रशासनास दिले आहे.