बीड करांसाठी आनंद वार्ता ; आणखी दोघांना मिळाला डिस्चार्ज…!
बीडमध्ये आणखी दोघांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली ६१ पैकी ५ कोरोनामुक्त
बीड : बीडमधून आणखी दोघांना सुटी देऊन घरी पाठविण्यात आले आहे. आता कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ५ झाली आहे. जिल्ह्यात एकूण ६१ रुग्णसंख्या आहे. पैकी एक मयत तर आता ५ कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या बीड जिल्ह्यात ४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सहा जणांवर पुण्यात उपचार चालू आहेत.
बीड जिल्ह्यात आतापर्यंत ६१ कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यात बीड १३, माजलगाव १५, पाटोदा १०, आष्टी ९, शिरूर २, गेवराई २, वडवणी ३, धारूर ३, केज २, परळी २ यांचा समावेश आहे. यातील माजलगाव तालुक्यातील ३, आष्टी तालुक्यातील १, गेवराई तालुक्यातील १ हे असे पाच लोक कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. अंबाजोगाई तालुका अद्यापही कोरोनामुक्त आहे. ४९ रुग्णांवर बीड जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. यातील बीडमध्ये उपचार घेणारे चौघांची प्रकृती जोखमीची असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार व त्यांची सर्व टिम रुग्णांना कोरोनामुक्त करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
अशी आहे जिल्ह्याची स्थिती :
एकूण रुग्णसंख्या – 61
कोरोनामुक्त – 5
मयत – 1
पुण्याला पाठविलेले – 6
बीडमध्ये उपचार घेत असलेले – 49