बीडमध्ये भर रस्त्यावर महिलेचा खून ; आरोपी स्वतः पोलिस ठाण्यात
बीड : एका 37 वर्षीय महिलेवर धारदार शस्त्राने वार करत निर्घृनपणे हत्या केल्याची घटना आज रात्री साडेसात वाजता शहरातील जालना रोडवरील हिना पेट्रोलपंपाच्या पाठीमागील परिसरात घडली आहे
महिलेला जिवंत मारल्यानंतर आरोपीने स्वत: पोलिस ठाण्यात हजर होत घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बीड शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हिना पेट्रोलपंपा च्या पाठीमागील परिसरामध्ये उर्मिला रमेश मस्के वय 37 रा, मंत्री गल्ली बीड या महिलेवर धारदार शस्त्राने वार करत तिचा खून करुन आरोपी स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाला. पतीनेच ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती असून आरोपी पती स्वतः शहर पोलिस ठाण्यात हजर झाला त्यानंतर घटनास्थळी डीवायएसपी भास्कर सावंत, शहर पोलिस ठाण्याचे एपीआय गजानन जाधव यांच्यासह पोलिस कर्मचार्यांनी धाव घेत घटनेचा पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला.