बीडमध्ये आणखी सात जण कोरोनामुक्त; आतापर्यंत ७१ बाधित झाले बरे
बीड : जिल्ह्यातील आणखी सात जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत ७१ कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९५ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. पैकी तिघांचा मृत्यू झाला असून ७१ जणांनी कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. बुधवार व गुरूवारी सात जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये धारूर तालुक्यातील आंबेवडगाव येथील तिघे, गेवराई तालुक्यातील मालेगाव बुदू्रक येथील एक, बीड शहरातील मसरत नगर भागातील तिघांचा समावेश आहे.
दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत चौघांचा कोरोनामुळे बळी गेलेला आहे. केजच्या महिलेची अद्याप जिल्ह्यात नोंद नसल्याने अधिकृतरित्या मृतांचा आकडा तिनच आहे.