बीडमध्ये आणखी एक कोराना बळी
बीड : येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका ७८ वर्षीय कोरोनाबाधीत रुग्णाचा मंगळवार (दि.१४) रोजी सकाळी मृत्यू झाला. यामुळे बीड जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या १० तर जिल्ह्यात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची संख्या १२ झाली आहे.
मृत्यू झालेला सदरील व्यक्ती बीड शहरातील रहिवाशी होता. त्याला उच्च रक्तदाबासह श्वसनाचा त्रास असल्यामुळे त्याला आँक्सीजनवर ठेवण्यात आले होते.
स्वब घेतलेल्या युवकाचा मृत्यू
अंबाजोगाई : कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यामुळे केज येथील रुग्णालयात 32 वर्षीय युवकाचा स्वब घेण्यात आला होता. मात्र, अहवाल येण्यापूर्वीच मंगळवारी पहाटे स्वाराती रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.
केज तालुक्यातील नांदूरघाट येथील एक तरुण केज येथील रुग्णालयात उपचार घेत असताना कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यामुळे सोमवारी दुपारी त्याचा स्वब घेऊन प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला. मात्र, त्याची प्रकृती खालावल्यामुळे त्याला रात्री अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी उपचार सुरू असतानाच या युवकाचा काही तासातच मृत्यू झाला. सदरील युवकाचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे. त्याचा अहवाल आज संध्याकाळपर्यंत येण्याची शक्यता आहे.