बीडकरांसाठी खुशखबर ; जिल्ह्याची कोरोणा मुक्तीकडे वाटचाल
बीड : जिल्ह्यात कोरोणा चा शिरगाव लवकर होऊ शकला नव्हता मात्र मुंबई-पुण्याहून आलेल्या लोकांनी डोकेदुखी वाढवली होती त्यामुळे रुग्णांची संख्या अर्धशतकी झाली असली तर योग्य उपचार करून आरोग्य विभागाने पुन्हा गतीने कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे शनिवारी दहा जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला तर रविवारी 14 जण पूर्ण मुक्त होऊन घरी परतत आहेत
आता एकूण कोरोनामुक्त झालेल्या लोकांची संख्या 29 झाली आहे. माजलगाव, केज, गेवराई तालुका कोरोनामुक्त झाला आहे.
बीड जिल्ह्यात आतापर्यंत ६३ जणांची कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. यात एकाचा मृत्यू झाला होता तर आतापर्यंत १५ जण कोरोनामुक्त झाले होते. सहा रुग्णांना पुण्याला पाठविले होते. त्यामुळे जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत ४१ रुग्णांवर उपचार सुरू होते. यातील माजलगाव तालुक्यातील १३ व बीड शहरातील एकाला प्रकृती ठणठणीत झाल्याने घरी पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे आता केवळ २७ रुग्ण उपचारासाठी राहणार आहेत.
माजलगाव, गेवराई, केज, हे तालुके कोरोना मुक्त झाले आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर आर. बी. पवार यांनी दिली आहे