Newsनांदेड

बिलोली शिक्षण विभागाच्या वतीने 3 लाख 36 हजार 391 चा धानादेश मुख्यमंत्री सहायता निधी सुपूर्द..!

कुंडलवाडी/मोहम्मद अफजल : कोरोना या राष्ट्रीय संकटकाळात बिलोली शिक्षण विभागाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधी जो जमा करण्यात आली होती. 3 लाख 36 हजार 391चा धानादेश आज दि. 26 मे 2020 रोजी नांदेड येथे जिल्हाधिकारी विपीन ईटनकर यांची भेट घेवून बिलोली गटशिक्षणाधिकारी हमीद दौलताबादी यांनी नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी,शिक्षणाधिकारी प्राथमिक दिग्रस्कर व उपशिक्षणाधिकारी बंडू आमदुरकर,शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बंडू पाटील भोसले यांच्या उपस्थितीत तो धनादेश जिल्हाधिकारी यांना सुपूर्द केले.
ही निधी बिलोली शिक्षण विभागाकडून कोरोना या राष्ट्रीय संकटकाळात गरजूंना मदत निधी म्हणून तालूक्यातील शिक्षक ,मुख्याध्यापक, शिक्षक संघटना, संस्थाचालक,शिक्षणविस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख ,व गटशिक्षणअधिकारी कार्यालयातील कर्मचारी यांच्या वतीने जमा करण्यात आली होती.
बिलोली तालूका शिक्षणविभाचा वतीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोरोनारग्रस्तासाठी दिलेल्या प्रतिसादाबद्दल माननीय जिल्हाधिकारी यांनी या उत्कृष्ट कामाबद्दल बिलोली तालुक्याचे
गटशिक्षणाधिकारी हमीद दौलताबादी यांचा अभिनंदन पत्र देऊन गौरवकरण्यात आले.
एकंदरीत राज्यात जिल्ह्यात कोरणा विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यासाठी प्रत्येकाने स्वयंस्फूर्तपणे उचलावयाची पाऊले लक्षात घेता बिलोली येथील शिक्षण विभागाच्यावतीने तालुक्यातील सर्व केद्रातील शिक्षणविस्तार अधिकारी,केंद्र प्रमुख व जिल्हा परिषद व खाजगी शाळेतील मुख्याध्यापक,
शिक्षक,शिक्षिका यांच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.त्या अनुषंगाने बिलोली तालुका शिक्षकांचा वतीने 3 लाख 36 हजार 391
रूपये मुख्यमंत्री सहायता निधी जामा करण्यात आले होते. बिलोली तालूक्यातील मुख्यमंत्री साह्यता निधी म्हणून आतापर्यंतची सर्वात मोठी रक्कम होय.
यासोबत गरजूवंताना जिवनावश्यक वस्तू देण्यात आले होते.
पुढाकारामुळे तालुक्यातील आतापर्यंतची सर्वाधिक मोठी निधी तीन लाख पंचवीस हजार रुपये बिलोली तालूक्यातील सर्व शिक्षण विस्तार अधिकारी,केंद्र प्रमुख जिल्हा परिषद व खाजगी संस्थेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांचा वतीने जमा करण्यात आले आहे.व ते मुख्यमंत्री सहायता निधीसाठी गटशिक्षणाधिकारी हमिद दौलदाबदी यांना सुपूर्द करण्यात आहे.तसेच यावेळी गरजूंना अन्नधान्याचे कीट ही वाटप करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *