बिलोली तालुक्यांचा झिरो फुटला ; केरूळ येथील एकास कोरोनाची लागण – डाॅ.सातमवाड यांची माहीती
कुंडलवाडी / मोहम्मद अफजल : बिलोली तालूक्यात कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला असून सबंधीत रूग्ण तालूक्यातील केरूळ येथील रहीवासी आहे.तो बिलोली येथील केव्हीड सेंटर येथे दि.17 मे रोजी नांदेड येथून दाखल झाला होता.त्या रूग्णाचे स्वॅब प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवीण्यात आले होते.स्वॅबचा आवहाल 21 मे रोजी प्राप्त झाला.तो आवहाल पाॅझिटिव्ह आला असून त्या रूग्णावर बिलोली येथील केव्हीड सेंटर येथे उपाचार चालू आहे.सबंधी रूग्ण पुण्यातून आलेला होता.अशी माहीती कुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.बालाजी सातमवाड यांनी दिली.
यावेळी पुढे बोलताना डाॅ.सातमवाड म्हणाले पुणे, मुबंई,आंध्रा,तेलंगणा राज्यातून कुंडलवाडी शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीक येत असून सबंधीत नागरीक रूग्णालयात तपासणी करून घेत आहे.
सिक्का मारून घेवून 14 दिवस होम कोरोनटाईन होत आहे.अशाच प्रकारे जे नागरीक ईतर राज्यातून,बाहेरून येत आहे.सर्व प्रथम त्यांनी आमच्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावे.सिक्का मारून घेवून 14 दिवस होम कोरोनटाईन होवून स्वताची व परिवाराची आणि समाजाची काळजी घ्यावी.असे आवाहन डाॅ.बालाजी सातमवाड यांनी केले.
एकंदरीत मोठ्या प्रमाणात नागरीक ईतर राज्यातून शहरात दाखल होत आहे.काही जन नियमानुसार तपासणी करून घेवून होम कोरोनटाईन होत आहे. तर काही प्रशासनास माहीती न देता तपासणी न करता शहरात,गावात बिनधास्त फिरत असल्यांची चर्चा नागरीकात चर्चीली जात आहे.तरी प्रशासनाने सबंधीतावर बारीक नजर ठेवावी अशी मागणी सुज्ञ नागरीकातून केली जात आहे.