बिलोली तहसीलच्या पथकाची तीन ठिकाणी कारवाई

हुनगुंदा पिकप,पाचपिंपळी ट्रक,कासराळी ट्रँक्टर जप्त

कुंडलवाडी (प्रतिनिधी) – कोरोना विषाणूच्या उपाययोजना करण्यात बिलोली महसूल विभाग व्यस्त असल्याने वाळूचोरटे मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत. महसूलचे बैठे पथके नावाला असली तरी भरारी पथकांकडून कारवाया सुरूच आहेत. दि.२८ मे रोजी पहाटे एका पथकाने तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन कारवाया करीत अवैध वाळूचे ट्रक, पिकअप व अवैध मुरूमाची वाहतूक करणारे ट्रँक्टर जप्त केले. या धडक कारवाईने अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणा-या चोरट्यांचे धाबे दणाणले आहे.बिलोली तालुक्याला मांजरा नदीचे पात्र लाभला आहे. मांजरा नदी पात्रातील वाळूला सोन्या पेक्षाही मोठी मागणी राज्यात व परराज्यात आहे यावर्षी कोरोनाच्या परिस्थिती मुळे वाळू घाटाचा लिलाव रखडला आहे. त्यामुळे अवैध उत्खनन करून वाळूची चोरटी वाहतूक करणारे चोरटे तालुक्यात मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत. बिना भांडवलीचा धंदा म्हणून अनेक नवखे या अवैध व्यवसायाकडे वळले आहेत. हा सर्व  गैरप्रकार रोखण्यासाठी तहसील प्रशासनाने भरारी व बैठे पथकाची नेमणूक केली आहे. बैठे पथकात तलाठी, ग्रामसेवक, पोलीस यांचा समावेश आहे. पण बैठे पथक नावालाच असून बैठे पथकातील कर्मचाऱ्यांना मँनेज करून वाळू माफीया सर्रास पणे रात्रीच्या वेळेस वाळू चोरून आणून चढ्या भावाने कुंडलवाडी शहर व तालुक्यात विक्री करीत आहेत. आजपर्यंत ज्या काही अवैध वाळू वाहतुकीवर कारवाया झाल्या त्या भरारी पथकाने च केल्या आहेत. बैठे पथकानी आजपर्यंत एकही कारवाई केली नाही हे मात्र विशेष. दि.२८ मे रोजी तहसीलचे नायब तहसीलदार अनिल परळकर, नायब तहसीलदार उत्तमराव निलावाड,तलाठी मोताळे, तलाठी बोंतावार,तलाठी बिराजदार यांचे भरारी पथक कर्तव्यावर असताना २८ मे रोजी पहाटे ३ वाजता कासराळी येथे अवैध मुरूमाचे ट्रँक्टर, पहाटे ५:३० वा हुनगुंदा येथे अवैध वाळू वाहतुकीचे पिकअप, सकाळी ७:३० वाजता पाचपिंपळी शिवारात हुनगुंदा येथून अवैध वाळू भरून चाललेला ट्रक जप्त करण्याची कारवाई केली.उपरोक्त तीनही वाहने तहसीलच्या प्रागंणात लावण्यात आली आहे. असून दंडात्मक कारवाई सुरू असल्याचे तहसील प्रशासनाने सांगितले आहे. एकदंरीत भरारी पथकाच्या या धडक कारवाईने अवैध वाळू चोरट्यांचे धाबे दणाणले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *