बाळापूर शिवारात अतिवृष्टीने शेतक-यांचे मोठे नुकसान

” आद्रक व मिरची पिके गेली वाहून; शासनाने पंचनामे करण्यांची मागणी”

आमठाणा (प्रातिनिधी) – सिल्लोड तालूक्यातील बाळापूर परीसरात गूरूवारी रात्री झालेल्या ढगफूटी पावसाने शेतक-याचे फार मोठे नुकसान केले आहेत यामध्ये वादळी वाऱ्यासह मोठया प्रमाणात अतिवृष्टी झाली परीसरातील नाल्यांना मोठया प्रमाणात पूर आल्यानी त्यांनी त्याचे भांडे सोडले यामूळे ते पाणी शेतकऱ्यांच्या शेतामधून गेले नदीकाटच्या शेतामधे शेतकऱ्यांचे आद्वक व मिरची पिके टिंब क वाहून गेले व दूबार पेरनीचे संकट शेतकरांन वर आले आहे या झालेल्या अतिवृष्टीमूळे पंचनामे लवकरात  लवकर करावे आसे आ०हाण शेतकरी वर्ग करत आहे  मा. तालुका कृषी अधिकारी श्री दिपक गवळी साहेब अजिंठा मंडळ कृषी अधिकारी श्री के एस पाडले साहेब यांचे मार्गदर्शन खाली काल दि 11/6/2020  रोजी सोसाट्याचा वारा वादळ व अतिवृष्टी मुळे बाळापूर खंडाळा पानास सराटी दिग्रस बोदवड तसेच अजिंठा मंडळातील इतर गावामध्ये शेतातील ठिबक वाहुन गेले त्याचप्रमाणे खूप शेते खंगळुन गेली आहे नुकतीच लागवड केलेल्या अद्रक मका कापूस या पिकांचे नुकसान झाले आहे या नुकसानीची पहाणी करण्यासाठी अजिंठा मंडळातील सुपरवायझर श्री एस जी तोटरे  एस पी सुरडकर त्याचप्रमाणे खंडाळा येथील कृषी सहाययक श्री नारायण वैद्य कृषी सहायक श्री अनिल सोनवणे तलाटी रविंद्र कुलकर्णी यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात झालेल्या नुकसानीची पहाणी केली यावेळी शेतकरी बांधव भगिनी तेजराव निंभोरे .संजय गाडेकर .आप्पा पारवे भगवान गाडेकर . विलास निभोरेइतर शेतकरी उपस्थित होते.

मी एक एकर आद्रकिची लागवाड केली होती यामध्ये जैन कंपनीचे टिबंक नवीन केले होते या पावसाने माझे पूर्ण पिक वाहून गेले  तरी शासनाने त्वरीत नुकसान भरपाई द्यावी. – आप्पा पारवे (शेतकरी बाळापूर)”

माझ्याकडे वीस सचगुंटे जमीन आहे मी त्यामध्ये पूर्ण मिरची लागवड केली होती टिबंक व पॉलीतीन पेपर नवीन केला होता मात्र पावसाने हे सर्व वाहून नेले. – तूकाराम गाडेकर (शेतकरी बाळापूर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *