बहिणीच्या मदतीसाठी धावुन आला राजेभाऊ फड…!!

परळी : अठरापगड समाजातील बहिणीच्या मदतीसाठी धावणारा कन्हेरवाडी गावचा सरपंच तथा रासपाचे युवाप्रदेशाध्यक्ष,मार्केट कमिटीचे संचालक राजेभाऊ?फड यांनी मदतीचा ओघ कायम ठेवला आहे त्याबदल त्यांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त होत आहेत
कन्हेरवाडी गावच्या सरपंचपदी राजेभाऊ फड यांच्या मातोश्री सौ.प्रभावतीबाई फड यांची निवड झाली होती त्यादिवशी राजेभाऊ फड यांनी गावातील अठरापगड समाजाच्या बहिणीसाठी दहा हजार रूपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती तीच परंपरा कायम ठेवल्यानंतर राजेभाऊ फड जनतेतुन सरपंच झाले त्यांनी अकरा हजार रूपयाची मदत देण्याची घोषणा केली त्या घोषणे प्रमाणे श्रीहरी तुळशीराम कुडके,बापुराव नामदेव मुुंडे,विष्णु दगडुबा फड,वसंत उत्तम मुंडे,बालाजी रानबा रोडे,प्रल्हाद विलास मुंडे यांच्या मुलीच्या लग्नासाठी आर्थिक मदत देण्यात आली.
यावेळी सोसायटीचे व्हाईस चेअरमन नाथराव फड,ग्रामपंचायत सदस्य महादेव रोडे,सेवा सह.सोसायटीचे सदस्य गोडींबा फड,केरबा गवळी,प्रशांत रोडे,गंगाधर रोडे,प्रविण रोडे,संदिपान रोडे,माधव मामा,यांच्यसह आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *