फेसबुकवर तेढ निर्माण करणारी पोस्ट टाकली,एकास अटक

अंबाजोगाई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची जिल्ह्यात सोशल मीडियावर बारकाईने नजर असून सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवण्यात येणाऱ्या अफवाचे व्हायरस जीव घेणे ठरत आहेत याला रोखने हे पोलिसांसमोरील मोठे आवाहन आहे. लॉकडाऊनच्या काळात घरी बसून फेसबुक व व्हाट्सअप वर अफवा पसरवणारे समाजकंटक काही कमी नाहीत, सायबर गुन्हे दाखल करण्यात महाराष्ट्रात बीड अव्वल असल्याचे दिसून आले आहे.
अंबाजोगाई शहरातील एकाने फेसबुकवर समाजामध्ये तेढ निर्माण करणारी वादग्रस्त पोस्ट टाकल्याने शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सुनील तुळशीराम सिरसाट वय.42वर्षे. असे आरोपीचे नाव आहे. आज त्याला न्यायालयासमोर हजार केले असता त्यास एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
एकंदरीत हकीकत अशी की सुनील तुळशीराम सिरसाट या नावाने फेसबुक अकाऊंटवरून शासन आणि प्रशासनाच्या विरोधात द्वेषाची भावना निर्माण करणारी व दोन समाजामध्ये एकमेकांविरुद्ध द्वेष, तेढ निर्माण करणारी पोस्ट केली होती ती प्रशासनाच्या विरोधात असल्या कारणाने शहर पोलिस ठाण्यात पो हे कॉ अभिमान दादाराव भालेराव यांच्या फिर्यादि वरून गु.र.न. १६२/२०२० कलम ५०५(२) भादवी नुसार आरोपी सुनील सिरसाट वय 42 वर्षे. रा. भगवान बाबा चौक अंबाजोगाई.याचा विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला आज न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *