फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या व्यापाऱ्यांना अंबड नगर पालिकेचा दणका

अंबड (प्रतिनिधी) – शहरामध्ये गेल्या तीन दिवसापासून शासकीय नियमांनुसार बाजारपेठ सुरु करण्यात आली. पहिल्याच दिवशी बाजारपेठेत लोकांनी तोबा गर्दी केली होती ग्रामीण भागातील नागरीक पाऊसाळा सुरु होण्या पूर्वी शेती उपयोगी पडणारे साहित्य तसेच अवजारे खरीदी करण्याकरिता तर काही कपडे खरीदिकारिता अंबड शहरात आले व शहरात एकदम गर्दी झाली त्यामुळे प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली होती तहसीलदार,मुख्याधिकारी,पोलीस निरीक्षक यांनी शहरभर फिरुन नागरिकांना आव्हान करत फिजिकल डिस्टनसिंगचे पालन करण्यास सांगितले गेल्या दोन दिवसापासून खरेदीसाठी येणार्या नागरिकांची संख्या वाढली आहे.दुकानासमोर ग्राहकांची गर्दी करू देऊ नका त्यांच्यात सुरक्षित अंतर ठेवा अशा सूचना दुकानदारांना देण्यात आल्या आहेत किरणा व्यापारी व जनरल स्टोअर्समध्ये व कापड व मेडिकल स्टोअरमध्ये सातत्याने गर्दी होताना दिसत आहे पोलिसांनी सूचना देऊनही तेवढ्यापुरतेच नियमांचे पालन केले जाते.मात्र पोलीस व अधिकारी गेल्यावर दुकानात खरेदीदारांची पुन्हा झुंबड उडताना दिसुन आल्याने मंगळवारी पोलिस व अंबड नगर पालिकेने संयुक्त कारवाई करुण व्यापार्याना मोठा दनकाच् दिला   आहे अंबडच्या चार मोठ्या व्यापार्यांवर दंडात्मक कारवाई करुण प्रत्येकी पाच हजार रुपये प्रमाणे वीस हजार रुपये दंड वसूल करण्यात आला  या वेळी तहसीलदार श्री राजीव शिंदे,मुख्याधिकारी श्री सागर घोलप,पोलीस निरीक्षक श्री अनिरुद्ध नांदेड़कर हे त्यांच्या फ़ौज फाट्या सह हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *