प्रेसनोट *पिकाच्या नुकसानीची माहिती पिकविमा कंपनीला देण्यासाठी तालुकानिहाय विमा कंपनी प्रतिनिधींची नावे जाहीर*

बीड, दि,28 :- (जि.मा.का.) माहे सप्टेंबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसामूळे पिकांचे काहीं ठिकाणी नुकसान झाल्याचे निदर्शनास येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिकविमा योजनेत सहभाग घेतला असेल अशा शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे जसे की, ढगफुटी, महापूर, अतिवृष्टी, भूष्खलन, चक्रीवादळ यामुळे पिकांचे नुकसान झाले असेल तर आपल्या पिकाच्या नुकसानीची माहिती पिकविमा कंपनीला देण्यात यावी. तालुका स्तरावर पिकविमा कंपनीचे प्रतिनिधी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहेत. त्यांची नावे व संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे आहेत. बीड-सोनवणे महेश निवृत्ती-8605068088, आष्टी-शेख शहानवाज मुक्तार-7721840101, पाटोदा-गोल्हार संपत आश्रुबा-976455203, शिरुर का.-कंठाळे विशाल हरिभाऊ- 8261948588, गेवराई-चिकणे धनजंय जगन्नाथराव- 9767237505, धारुर-देशमुख व्यंकटेश रमेशराव-9096646579, वडवणी-देशमुख जिवरावभास्कर-9595142896, माजलगाव-मोरे अशोक सुखदेव-8379026322, परळी-फड नागेश्वर विश्वंभर-9067970180, केज-केदार ओंकार लहु-9405857777, अंबाजोगाई-मुंढे सोपान भानुदास-9096607952 नुकसानी बाबत अर्ज करण्यासाठी क्रॉप इंन्सुरंस ॲप्लीकेशनचा वापर करता येतो. यासाठी http://digitaldg.in/ या वेबसाईटचा वापर करावा. तसेच ऑनलाईन अर्ज कसा करावा हा व्हिडीओ पाहण्यासाठी युट्युब चॅनलवर http://youtu.be/IEBY6wyK8-A या लिंकवर उपलब्ध असल्याचे राजेंद्र निकम, जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी, बीड यांनी कळविले आहे. -*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *