प्रेमी युगलांचा विहिरीत आढळला मृतदेह

गेवराई : तालुक्यातील माटेगाव शीवारात एका विहिरीत सतरा वर्षीय मुलगा व सोळा वर्षीय मुलीचे प्रेत तरंगताना आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे, दोघांनी आत्महत्या केली कि घातपात या बाबत नेमके कारण मात्र समजू शकले नाही.
भाटअंतरवली ता.गेवराई येथील शुभम रोहिदास कापसे वय १७ तर पाथरवाला खुर्द ता.गेवराई येथील कावेरी राजेंद्र खंदारे वय १६ या दोघांचेही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत तरंगताना माटेगांव शीवारातील एकाच विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे..घटनेची माहिती मीळताच चकलांबा पोलीस ठाण्याचे पोनी मारोती मुंडे, पो. कॉ.
अमोल औसरमल यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढून उमापूर प्रा.आ.केंद्रात शवविच्छेदना साठी आणले आहे. प्रा.आ.केंद्रात शववीच्छेदनाची प्रक्रीया सुरु आहे.सदरच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *