प्रसिद्ध अभिनेते इरफान खान यांचे निधन

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते इरफान खान यांचं वयाच्या 54 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांची अचानक तब्येत बिघडल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. इरफान खान यांना न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरचा आजार होता. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. अभिनेता इरफान खान यांनी लंडनमध्ये कॅन्सरवर यशस्वी उपचार घेतले होते. त्यानंतर भारतात परल्यावर अचनक त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *