प्रशासकीय सूचनांचे पालन न करणाऱ्या विरुद्ध पालिकेकडून दंडात्मक कारवाई
परतूर (प्रतिनिधी) – मागील आठवड्या पासून शहरात गर्दी दररोज वाढ असल्याने वारंवार सूचना देऊनही नागरिक मास्कचा वापर करीत नाही तसेच दुचाकीवर ट्रिपल सीट फिरणाऱ्यावर पालिकेकडून कारवाई करण्यात आली यात दंड आकारून सोडण्यात आले गुरुवारी (ता.०४ मार्च) शहरातील विविध ठिकाणी नगर परिषदेच्या वतीने मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.यात पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. टाळेबंदीमध्ये शिथिलता दिल्यानंतर नागरिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येत आहेत.यातून गर्दी होत आहे. येथील रेल्वे गेट चौक, महादेव मंदिर या ठिकाणी अशीच गर्दी गुरुवारी सकाळी झाली होती. मास्क न लावता फिरणारे नागरिक तसेच दुचाकी वर डबल सीट ट्रिपल सीट फिरणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली यात पाच हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच शहरात इतर ठिकाणीही अशा पद्धतीची कारवाई करण्यात आली आहे. सायंकाळपर्यंत मास्क न घालणारे व शारीरिक अंतराच्या नियमाचे पालन न करणाऱ्यावर कारवाई करून ५०० हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.सदरील कारवाई चंद्रकांत खनपटे,अतुल देशपांडे, पोलीस कर्मचारी दळवी,अर्जुन बोनगे,गणेश उबाळे,सुनील जाधव यांच्या पथकाने केली.