प्रमिलादेवी पाटील महाविद्यालयात दक्षता जनजागृती सप्ताह!

नेकनूर : येथील प्रमिला देवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालय नेकनुर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आज दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करून शपथ देण्यात आली याप्रसंगी गांधी  कला व विज्ञान महाविद्यालय कडा येथील समाजशास्त्र विभाग प्रमुख  प्रा.शिवाजीराव भोसले प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते. तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दादासाहेब मोटे हजर होते. सर्वप्रथम राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा कांतराव कलाणे व डॉ चित्रा धामणे यांनी या जनजागृती सप्ताहाचे महत्व समजून सांगितले. तर  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दादासाहेब मोटे यांनी भ्रष्टाचार निर्मूलन व भ्रष्टाचार मुक्त मानव झाला तर समाजात त्याची प्रतिमा उच्च दर्जाची निर्माण होऊ शकते असे प्रतिपादन केले.तसेच प्रमुख पाहुणे प्रा.भोसले शिवाजी यांनी  भारत भृष्टाचार मुक्त होण्यासाठी त्याची सुरुवात स्वता:पासून केली पाहिजे असे सांगून समृद्ध भारतासाठी त्याची गरज आहे असे सांगितले.  या जनजागृती सप्ताहानिमित्त सर्वांना शपथ प्रतिज्ञा वाचन सांस्कृतिक विभाग प्रमुख  प्रा.मुजावर एस.टी. यांनी दिली. याप्रसंगी महाविद्यालयातील प्रा. लोमटे आर एल. डॉ मातकर ,डॉ देशमुख, डॉ.जाधव श्री.गायकवाड  इ्. प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी हजर होते. कोरोणाच्या नियमावलीनुसार सोशल डिस्टंसिंग ने  हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी   प्रा. कलाणे के.के.यांनी केले. तर  प्रा.मुजावर एस.टी. यांनी उपस्थितांचे आभार मानले.

75 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *