प्रमिलादेवी पाटील महाविद्यालयात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा

  नेकनूर : येथील  प्रमिला देवी पाटील  कला व विज्ञान महाविद्यालयात  आज 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा करण्यात आला.   या कार्यक्रमांमध्ये सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून हा मुक्तिसंग्राम दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी सर्व प्रथम महाविद्यालयाचे   प्राचार्य डॉ. गौतम पाटील यांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.. तदनंतर   ध्वजारोहण ही करण्यात आले.

    या कार्यक्रमाचे ध्वज संचलन क्रिडा विभाग प्रमुख प्रा. डॉ.जाधव एस.एच.यांनी केले. 

     तर सुत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.मुजावर एस.टी. यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा कलाने के.के. यांनी मानले. या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील  प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी हजर होते.

76 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *