प्रतिबंधात्मक कारवाईच्या प्रकरणात पैसे मागणारा कर्मचारी निलंबित..
बीड : प्रतिबंधात्मक कारवाई पोलिस स्टेशन स्तरावर किंवा तहसीलमध्ये केली तर पाच सहा हजार लागतील. एलसीबीकडे पाठविलं तर पंधरा हजार लागतील’ या शब्दात प्रतिबंधात्मक कारवाईच्या प्रकरणात पैसे मागणार्या पेठ बीड पोलिसठाण्यातील पोलिस कर्मचारी अर्जुन राख याला निलंबीत करण्यात आले आहे. जानेवारीमध्ये झालेल्या संभाषणाची ही ऑडीओ क्लिप दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाल्यानंतर पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी हा निर्णय घेतला आहे. पेठ बीड पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी अर्जुन राख याचे एका व्यक्तीबाबतचे प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पैसे मागणार्या संभाषणाची ऑडीओ क्लिप दोन दिवसांपूर्वी समोर आली होती. यात पोलिस ठाण्याच्या स्तरावर किंवा तहसील कार्यालयात प्रतिबंधात्मक कारवाई पाठवायची असेल तर पाच सहा हजार रुपये लागतील आणि एलसीबीकडे प्रकरण गेले तर पंधरा हजार रुपये लागतील असे संभाषण पोलिस कर्मचारी अर्जुन राख याने केल्याचे समोर आले आहे. जानेवारी महिन्यातील हे संभाषण असल्याचे हे समजते. मात्र मागच्या काही काळात पोलिस अधिक्षकांनी घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे संबंधीत व्यक्तीने ती ऑडीओ क्लिप आत्ता व्हायरल केली असे सांगण्यात येते. या प्रकरणात पोलिस अधिक्षकांनी अर्जुन राख याला तडकाफडकी निलंबीत केले आहे.