Uncategorized

प्रतिक ट्रेडर्सचा ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)ः- प्रतिक ट्रेडर्स या नावाने श्रीफळ (नारळ) होलसेल विक्रीचा शुभारंभ राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज करण्यात आला. नारळाची वाढती मागणी पाहता परळीकरांना चांगली सेवा मिळावी या उद्देशाने प्रा.डॉ.मधुकर आघाव यांनी प्रतिक ट्रेडर्स या नावाने श्रीफळ (नारळ) होलसेल विक्रीचा व्यवसाय सुरु केला असुन याचा शुभारंभ ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी ना.धनंजय मुंडे यांचा शाल, श्रीफळ व फेटा बांधुन प्रा.डॉ.मधुकर आघाव यांनी सत्कार केला. या प्रसंगी आ.विक्रम काळे, बीड जिल्हा परिषदेचे गट नेते अजय मुंडे, जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव सिरसाट, डॉ.सुर्यकांत मुंडे, जि.प.सदस्य बालासाहेब शेप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव(भैय्या) धर्माधिकारी, नगरसेवक चंदुलाल बियाणी, परळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुर्यभान(नाना)मुंडे, संचालक माणिकभाऊ फड, परळी पंचायत समितीचे उपसभापती बालाजी (पिंटु) मुंडे, माजी नगरसेवक सुरेशअण्णा टाक, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते तुळशीराम पवार, विकास बिडगर, अभय मुंडे आदींसह परळी तालुक्यातील विविध गावचे सरपंच, विविध संस्थांचे संचालक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत प्रा.डॉ.मधुकर आघाव यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *