पौर्णिमा, शुभम व बी.आर.काॅटेज जिनींग वर वजन काटा अभावी शेतकऱ्यांच्या रांगाच रांगा…!!
परळी : परळी तालुक्यातील कौडगाव येथील पौर्णिमा, शुभम व बी.आर.कॉट या तिन्ही जिनिंगवरती अनेक दिवसापासून वजना अभावी रांगेत उभे असलेली सर्व वाहनाचे प्रत्येक्ष माप करण्यात आले. पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब व जिल्हाधिकारी रेखावार साहेबांच्या आदेशाने सर्व टीम हि तिन्ही जिनिंग वरती पोहचली. अनेक वाहने 8ते10 दिवसापासून उभे होती.
याप्रसंगी तहसिलदार बिपीन पाटील, परळी मार्केटचे सभापती अड् गोविंद फड, तालुका उपनिबंधक, फौजदार डोंगरे, राकॉ चे तालुका अध्यक्ष लक्ष्मण पौळ, रो.ह.यो. तालुका अध्यक्ष राजाभाउ पौळ, माउली गडदे, राजेसाहेब निर्मळ-पाटील, संजय जाधव, मार्केटचे सचिव रामदासी तसेच सहकार व पोलीस खात्याचे कर्मचारी आणि जिनिंग व मार्केटचा मोठा कर्मचारी वर्ग यावेळी उपस्तीत होता.
पाऊसाळा सुरु झाल्यामुळे पेरणीचा एक एक दिवस महत्वाचा असतो. आणि त्यातच दिवसाला वाढत चाललेले वाहनाचे भाडे. पेरणीपूर्व राहिलेली कामे करावी की कापसाचे माप, अशा दिवया मनस्तिती मध्ये सापडलेले संबंधित शेतकरी पार वैतागले होते. आठ दिवसानंतर कापूस वाहनाचे काटा झाल्यामुळे संबंधित कापूस उत्पादक शेतकरी आनंदी वातावरणात आपल्या घरी परतले.
या सतकार्याचा स्वतःला मी एक छोटासा घटक मानतो.
रकडत पडलेल्या सुमारे 100 वाहनाचे तीन तासात माप करण्यात जे यश आले आले त्याचे मोल हे अमूल्य आहे. ज्यांनी याप्रसंगी प्रत्येक्ष , अप्रत्येक्ष सहकार्य केले त्यासर्वांचे शतशः आभार.
कबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांची कष्ट हालके व्हावीत व असेच सतकार्य घडात राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना.