पो. नि. कौठाळे यांनी त्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या
3 लाख 68 हजाराचा मुद्देमाल जप्त
जालना (प्रतिनिधी) – सध्या कोरना या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले असून यामुळे संपूर्ण देशावर मोठे संकट येऊन ठेवले असल्याने लॉक डाऊन लागू करण्यात आले आहे. याच लोक लावून चा फायदा उचलून काही चोरट्यांनी 21 मार्च 2020 रोजी पुणे येथून भाडे घेऊन जालना येथे आलेला ट्रक (क्र.एमएच-१२, एचडी-9199) हा लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे एमआयडीसीतील मेटारॉल कंपनीसमोर उभा करण्यात आला होता. दि.20 मे रोजी या ट्रकच्या 4 डिस्क, टायर नटबोल्ट खोलुन चोरट्यांनी चोरी केल्याचे लक्षात आले होते. चंदंनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांनी याप्रकरणी टोकाची भूमिका घेत त्या दोन चोरट्यांच्या मुुुुुुसक्या आवळल्या. याप्रकरणात पोलिसांनी शेख अन्सार याचा शोध घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. घरातून मुद्देमाल काढून दिला. या गुन्ह्यात टायरच्या वाहतुकीला मदत करणारा शेख अफसर (रा. इस्लामपुरा) यास छोटा हत्तीसह (क्र. MH 21, X 1895) ताब्यात घेण्यात आले. पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे, ASI घोडे, नापोकाँ. प्रभाकर वाघ, नंदलाल ठाकूर, गोविंद पवार, अनिल काळे, चंद्रकांत माळी यांनी ही कामगिरी केली आहे.