Uncategorizedजालना

पो. उप. नि. प्रमोद बोडले यांना निरोप

चंदनझिरा ( प्रतिनिधी) – चंदनझिरा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीसउपनिरीक्षक  प्रमोद बोडले  यांची  गोंदी पोलिस ठाण्यात   बदली झाल्याने त्यांना पोलीस ठाणे व चंदनझिरा परिसरातील नागरिकांच्या वतीने निरोप देण्यात आला. चंदनझीरा  पोलिस ठाणे परिसरात फिजिकल डिस्टन्सींग चे पालन करून झालेल्या   निरोप समारंभ प्रसंगी   पोलिस  निरीक्षक  शामसुंदर  कौठाळे यांनी प्रमोद बोडले यांचा सत्कार केला. तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री सिरसाठ  उपनिरीक्षक  सुनिल इंगळे , रमेश चव्हाण ,  विधी सल्लागार  बालाजी पांचाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोडले यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शन व सर्वांच्या सहकार्याने यशस्वी कारकीर्द राहिली असे नमूद करत येथील कार्यकाळ स्मरणात राहील अशा भावना व्यक्त केल्या. या वेळी पो. उप. नि. घोडे, शांतीलाल राऊत, प्रभाकर वाघ,  अनिल काळे,नंदलाल ठाकुर, कृष्णा भडांगे, भरत करडूले, गोविंद पवार, रमेश तुपे,गणेश शेळके, शिव चव्हाण,कदम, निकाळजे, यांनी ही पो उप नि. बोडले यांचा  सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *