पोलीस निरीक्षकाने केला रस्त्यावर रोजा इफ्तार…!

पुणे :- करोना ने देशात हल्ला केल्यानंतर त्याला पळवून लावण्यासाठी दिवस रात्र सरकारी अधिकारी कर्मचारी महेनत घेत आहे . नागरिकांना घरात बसून करोना विरोधात लढायचे असून तसा काही ठिकाणी नागरिक सहकार्य करत नसल्याने पोलिसांना नाईलाजाने त्यांना शिक्षा करावी लागत आहे. नागरिकांनी जरा या अधिकारी कर्मचारीबद्दल हि विचार करायला हवा आहे कि हे लोक आपले जीव धोक्यात घालून तुमच्यासाठी रस्त्यावर आहे .करोना संक्रमितांचा आकडा कमी करण्यासाठी पोलिस अधिकारी व कर्मचारी हि दिवसरात्र प्रयत्न करत आहेत. कर्तव्य पहिले नंतर धर्म असाच एक आदर्श घालणारा अनुभव पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यातील पोलिस निरीक्षकाकडून पहायला मिळाला. काल वानवडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सय्यद नगर ते श्रीराम चौक येथे पोलिस मार्च काढण्यात आला होता मार्च संपेपर्यंत रोजा इफ्ताराचा वेळ झाला होता .पोलीस ठाण्यापर्यंत जाण्या एवढं वेळ नसल्याने हडपसर सय्यदनगर रेल्वे गेटजवळच फुटपाथवर बसून वानवडीचे पोलिस निरीक्षक ( गुन्हे) सलीम चाऊस यांनी रोजा इफ्तार केला फुटपाथवर रोजा इफ्तार करून कर्तव्यदक्षपणा दाखवला . कर्तव्याला प्राधान्य दिल्याने त्यांच्यावर सर्व स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *