पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार स्वतः होम क्वारंटाईन !!
बीड : जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःला क्वारंटाईन केल्यानंतर आता बीडचे पोलीस अधीक्षक देखील क्वारंटाईन झाले आहेत. पोलीस अधीक्षक पालकमंत्र्यांच्या थेट संपर्कात नसताना देखील क्वारंटाईन झाल्याने त्यांच्या क्वारंटाईनचे नेमके कारण काय याच्या चर्चा सुरु असून आता त्यांच्या कार्यालयाकडूनच त्याचे उत्तर दिले गेले आहे.
बीडचे पोलीस अधीक्षक कोणत्याही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या थेट संपर्कात आले नाहीत. मात्र बीडच्या पालकमंत्र्यांच्या बंदोबस्तात असलेल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे. पोलिसांच्या समस्या अधीक्षकांपर्यंत मांडण्यासाठी जो ‘ओआर’ असतो, त्या ‘ओआर’मध्ये अधीक्षकांना काही कर्मचारी भेटले आणि ते पालकमंत्र्यांच्या संपर्कात होते, त्यासाठी खबरदारी म्हणून पोलीस अधीक्षक क्वारंटाईन झाले आहेत.