*पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने परळीत मंगळवारी निदर्शने*

परळी वैजनाथ, प्रतिनिधी…. केंद्र सरकारने वाढविलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत असून ही दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी; यासाठी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शना खाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने परळीत मंगळवारी दि.६ रोजी निदर्शने करण्यात येणार आहेत. केंद्रातील मोदी सरकारने पेटोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किंमती भरमसाठ वाढविल्या आहेत. पेट्रोलने १०० रुपये लिटरचा टप्पा पार कला असून डिझेल ९२ रुपये लिटर झाले आहे. ही दरवाढ सामान्य माणसाच्या जीवनावर उठली आहे. तसेच स्वयंपाकाचा गॅसही महागला आहे. यामुळे सामान्य लोकांचे जगणे कठीण झाले आहे. कोरोनाच्या संकटाने आधीच जनता त्रस्त आहे. त्यात महागाईचा मार सहन करावा लागत आहे. मोदी सरकारने पेट्रोल- डिझेलमधून कराच्या रुपाने लाखो कोटी रुपये नफा मिळवून सामान्य जनतेला मात्र महागाईच्या खाईत लोटले आहे. याच्या निषेधार्थ ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात येणार आहेत. मंगळवारी (दि.६) सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे. कोविडविषय नियमांचे काटेकोरपणे पालन करून हे आंदोलन करण्यात येणार आहे. तरी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व पदाधिकारी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *