LatestNewsपरभणी

पूर्णा येथे रेल्वेचे इंजिन घसरले मोठी दुर्घटना टळली…!

पूर्णा : आज दि.11 रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास स्थानकावर रेल्वे इंजिन सेंट्रीग साठी पटरीवर धावत असताना चुकीच्या पटरीवर गेल्याने सदर घटना घडल्याचे दिसत आहे यात कोणतीही जीवित हाणी झाली नसून मोठी दुर्घटना टळली आहे.

दरम्यान अधिक माहिती अशी की कोरोना महामारीत रेल्वे बंद असल्याने कोणतीही रेल्वे स्थानकावर उभी नसल्याने मोठी दुर्घटना टळली असल्याचे दिसून आले परंतु हे इंजिन चुकीच्या पटरीवर कसे धावले यात चालक शिकाऊ होता की पटरी ज्या रूळावर धावायची त्या रुळावर न धावता चुकीच्या रुळावर धावली मग यात पटरी रुळाचे यंत्रणा काम पाहणाऱ्या च्या चुकीने घटना घडली हे अद्याप मात्र गुडस्त्यात बंद आहे रेल्वे इंजिन हलवीन्याचे काम सुरू असून या मध्ये कोणी दोषी आणि निष्काळजी पणे काम केले या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे रेल्वे प्रशासन व अधिकारी यावर कोणती कार्यवाही करणार या बाबत नागरिकांत चर्चा सुरू असल्याचे दिसत आहे…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *