पूर्णा येथिल तहसीलदार यांच्या दुर्लक्षाने सोशल डिस्टन्स राहिले फक्त शब्दाने…?
पूर्णा /सय्यद कलीम : येथील पूर्णा नदीवरील कोल्हापुरी बंधारा सिध्देश्वर धरणाच्या जलाशयातील सोडलेले पाण्याने तुडुंब भरल्याने पाण्यात पोहण्याचा आनंद घेतांना ३०० ते ३५० युवकाकडुन कोव्हीड १९ च्या सोशल डिस्टन्स चे पालन केले जात नाही त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होवु शकतो म्हणून पाणी पुरवठा विभागाने निवेदनाद्वारे पूर्णा पोलीस ठाण्यात संरक्षणाची मागणी केली आहे .
येथील नगरपालिका पाणी पुरवठा विभागाने पोहणाऱ्या युवकांची संख्या लक्षात घेता सरंक्षणाची मागणी पोलीस निरीक्षक गोवर्धन भुमे यांच्याकडे केली आहे . पोहणे हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे व उन्हाची तीव्रता असल्याने शाळकरी मुले व तरुण मुले यांची संख्या अधिक एकत्र येत आहेत म्हणून कोरोनाच्या नियमाचे पालन होत नसल्याने व सांगितलेले कोणीही ऐकत नाही म्हणून पाणी पुरवठा विभागाने आणि तहसिल कार्यलय पूर्णा यांच्याकडे सरंक्षनाची निवेदन देवून मागणी केली आहे .