पुन्हा १५ ने वाढला कोरोनाचा आकडा

बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची दुहेरी अंकातील वाढ मागील काही दिवसांपासून सातत्याने सुरु असून गुरुवारी (१६) आणखी १५ जण पॉझिटिव्ह आले आहेत.यामध्ये बीडमधील १०, गेवराई २, केज २, अंबाजोगाई १  असे रुग्ण आहेत. 
केज तालुक्यातील नांदुरघाट येथील एकाच स्वॅब घेतल्यानंतर मृत्यु झाला होता, आता त्याच्या कुटुंबातील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. बीडमधील १० पॉझिटिव्ह आढळले असून ते एका खाजगी रुग्णालयातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले होते.केज तालुक्यतील नांदुरघाटमधील दोघे गेवराईतील माऊली नगर आणि मोटे गल्लीमधील दोघे व परळीत सर्व्हेश्वर नगरमधील १ जण पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान आज १५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने आता जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या २७७ इतकी झाली आहे तर सक्रिय रुग्णांची संख्या १२५ इतकी झाली आहे . 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *