पुण्यात अडकून पडलेल्या मतदारारांसाठी धनंजय मुंडे यांचा मदतीचा हातभार
पुणे : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतःच्या मतदारसंघातील नागरिकांच्या उपासमारीची दखल घेत राशन व गरजू वस्तूंचा पुरवठा करण्याचे आश्वासन देत धीर सोडू नका,हे दिवस राहणार नाहीत,काळजी घ्या, अशा संकटाच्या काळात मी धनंजय मुंडे मतदारसंघातील नागरिकांच्या मदतीसाठी सदैव पाठीशी उभा असल्याचे वचन देत मोठा आधार दिला.
मुंबई व पुण्यात कोरोनामुळे जनजनवीन विस्कळीत झाले असून लॉकडाऊनचा परिणाम हातावर पोट असणार्या मजूरांना अधिक बसत आहे. त्यातली-त्याचसोबत स्थलांतरीत मजूरांचे तर पुरते हाल होत आहे. नोकरी व काम धंदे नसल्यामुळे पैशाचे वांदे झाले आहेत. त्यामुळे घराचे भाडे व पोट भरायचे कसे असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. एकीकडे पुण्यातून गावाकडे जाणे अशक्य झाले आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये रोजी-रोटीचा प्रश्न हलाखीचा होऊन बसला.
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघातील पट्टीवडगाव येथे राहणारे वीस ते पंचविस सदस्यांचे कुटुंबियांची उपासमार होत आहे. यामुळे संतापून जगावे,की मरावे असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करत आमच्या जगण्या प्रश्न सोडवावा,अन्यथा सामुदायिक आत्मदहन करण्यास परवानगी द्यावी, असे ही करू न दिल्यास गावाकडे जाण्याची तरी परवानगी द्यावी, अशी मागणी एका पत्राव्दारे केली होती.
यासंबंधीचे पत्र बातमी24.कॉम याबातमी वेबपोर्टलच्या हाती लागले होते. या बातमी कॉम ची तात्काळ दखल घेत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मतदारसंघातील नागरिकांची आस्थेवाईकपणे चौकशी करत, धीर सोडू नका, स्वतःसह परिवाराची काळजी घ्या, आपल्यापर्यंत राशन व गरजेच्या वस्तूंचा पुरवठा होईल. तसे कार्यालयातील कर्मचार्यांना सांगितल्याचे मुंडे यांनी आवर्जून सांगत धीर न सोडण्याचा सल्ला पट्टीवगावच्या नागरिकांना दिला.
राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व देणारे नेतृत्व
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या पंचविस ते वीस वर्षांच्या राजकीय व सामाजिक जिवनात राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व दिले. त्यामुळे त्यांचे नेतृत्व महाराष्ट्रभर लोकप्रिय होत चालले आहे.या लॉक डॉॅउनच्या काळात मतदारसंघातील वीस ते पंचविस हजार गरजू लोकांपर्यंत किराणा व भाजीपाला पोहचिती केला आहे.