Uncategorizedजालना

पिरपिंपळगांव येथे आरोग्य पथकाकडून सर्वेक्षणाचे काम सुरू

पुढील 14 दिवस चालणार सर्वेक्षणाचे काम 

जालना (प्रतिनिधी) ः तालुक्यातील पिरपिंपळगांव येथे (ता.2 जून) रोजी एक कोरोना पॉझीटीव्ह रूग्ण आढळुन आला होता. त्यामुळे या परीसरातील नागरीकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. मंगळवार (ता.2) पासून याच पार्श्‍वभुमीवर विशेष खबरदारी बाळगत पिरपिंपळगांव येथे आरोग्य विभागाचे पथक दाखल झाले. यावेळी त्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांना घाबरून न जाता विशेष काळजी घेण्याचे आवाहन करीत सर्वेक्षणाचे काम सुरू केले असुन पुढील 14 दिवस सर्वेक्षणाचे काम सुरू राहणार आहे. पिरपिंपळगाव येथील कोरोना रूग्ण नुकताच मुंबई येथुन परतला होता. मठपिंपळगाव येथील 27 नागरीकांसोबत एका  खाजगी वाहनात पिरपिंपळगांव येथील तीन जण मुंबई येथुन आले होते. त्यातील एक कोरोना पॉझीटीव आल्याने  प्रशासनाची मोठी धांदल उडाली. यामध्ये प्रशासनाने कुठेही हयगय न करता वैद्यकीय अधिकारी डॉ. मिर्झा बेग यांनी तात्काळ पिरपिंपळगांव प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत कार्यरत सर्व आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आशासेविका, अंगणवाडी सेविका यांची तातडीची बैठक घेऊन पिरपिंपळगाव येथे सर्वेक्षणाचे काम सुरू करून योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सुुुचना दिल्या. त्यानूसार टिम प्रमुख डॉ. मिर्झा बेग यांच्या नियंत्रणाखाली 10 टिम मधील सर्व अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका युध्दपातळीवर कामाला लागले आहेत. मंगळवार ता. 2 पासून त्यांनी घराघरात  जाऊन प्रत्येक कुटुंबातील सदस्याचे सर्वेक्षण करण्यास सुरूवात केली असुन आतापर्यंत 2034 नागरिकांचे सर्वेक्षण केले असून यापुढे 14 दिवस सर्वेक्षण सुरू राहणार असल्याची माहीती टिम प्रमुख डॉ. मिर्झा बेग यांनी दिली.   या मोहिमेत सहभागी पिरपिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र प्रमुख डॉ. मिर्झा बेग, सुपरवायझर आरोग्य सहाय्यक सुभाष मगरे,  शोभा तींडुलककर, दीपा रगडे, आशासेविका शारदा कांबळे, मिरा शेळके, लता जुंबड, शकुंतला खडके, वैशाली वैद्य, माया गायकवाड, अनिता जायभाय, सविता इर्शिद, संध्या दाभाडे, वर्षा ढगे,  वर्षा लहाने यांच्यासह अंगणवाडी सेविका आदी परिश्रम घेत आहे. 

कोरोना योध्दा डॉ. मिर्झा कबीर बेग 

 भोकरदन रस्त्यावर असलेले जालना तालुक्यातील पीर पिंपळगाव हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रांत 27 गावांपैकी  नुतनवाडी 5, चौधरीनगर 1, गुंडेवाडी 1, पिरपिंपळगाव 1 गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. 27  गावांची जबाबदारी एकट्या वैद्यकिय अधिकारी डॉ. मिर्झा कबीर बेग यांच्यावर असुन त्यांचे सहकारी त्यांना मोलाचे सहकार्य करीत आहे.  कोरोनाची सगळी जबाबदारी ते आपल्या मोजक्या कर्मचार्‍यांच्या मदतीने सांभाळत आहेत. रणरणत्या उन्हामध्ये दुचाकीवरून प्रवास करुन डॉ. बेग या गावांचे आरोग्य सांभाळत आहेत. यामध्ये गावात आलेल्या-गेलेल्या सर्व ग्रामस्थांची नोंद घेणे, वेळच्या वेळी त्यांची तपासणी करणे, त्यांना मार्गदर्शन करणे असे सर्व काम डॉ. बेग यांना करावे लागत आहे. अशा परिस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी सहायक आरोग्य सहाय्यक सुभाष मगरे, आरोग्य सेवक के.के. बोर्डे यांच्यासह आशासेविका, अंगणवाडी सेविका चांगल्या प्रकारे डॉ. बेग यांना सहकार्य करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *