पालघर येथील घटनेचा सिद्धिविनायक मिशनकडून जाहीर निषेध
परळी : पालघर मधील गडचिंचले गावामध्ये जुना आखाड्यामध्ये दोन भगवाधारी साधु व त्यांच्या कारचे चालक यांची अत्यंत क्रूर निर्दयपणे झालेल्या हत्येचा सिद्धिविनायक मिशनच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू असतांना देशात यामुळे लॉक डाऊन सुरु आहे याच लॉकडाऊन च्या काळात पालघर जिल्ह्यातील एका गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात जमाव एकत्रित होऊन हिंसक होतो आणि पोलिसांच्या उपस्थितीतच दोन साधू व त्यांच्या चालकाची हत्या होत असेल तर यामागे निश्चितच मोठे षडयंत्र असल्याची शंका सिद्धिविनायक मिशनकडून उपस्थित करण्यात आली. अहिंसा,समाजाच्या अध्यात्मिक उन्नतीसाठी त्याग भावनेने समर्थित मानवतेची शिकवण देणाऱ्या साधूंची पुरोगामी म्हणविणाऱ्या महाराष्ट्रामध्ये झालेली निर्घुण हत्या मनाला अत्यंत क्लेश,दुःख आणि संतापजनक आहे राज्य शासनाच्या कार्यक्षमतेवर या घटनेमुळे निश्चितच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे त्यामुळे केंद्र सरकारचे गृह मंत्रालय आखाडा परिषद योगी आदित्यनाथ यांनी घेतलेली भूमिकाच योग्य असल्याचे सिद्धिविनायक मिशनच्या वतीने सांगण्यात आले या प्रकरणातील आरोपींवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा अन्वये कार्यवाही करून या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन निष्पक्ष चौकशी करून दोषींना कठोरात कठोर शासन व्हावे अशी मागणी सिद्धिविनायक मिशनच्या वतीने परळी वैद्यनाथ येथे तहसीलदार विपीन पाटील यांना निषेध पत्र देऊन केली. यावेळी मिशनचे अध्यक्ष स्वामी डाॅ.तुळशीराम महाराज गुट्टे, अँड राम चाटे व बंडू गुट्टे हे उपस्थित होते.