पालखी सोहळा होणार याबाबत एकमत… नियोजन आणि स्वरुप कसे असेल हे शासनाशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल…!
आळंदी देवाची / दिनेश कुऱ्हाडे : संपूर्ण वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या भगवंत पांडूरंगाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पायी जात असतो, महाराष्ट्रातून विविध संतांच्या पालख्यांचे पंढरपुरच्या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी विविध संतांचा प्रस्थान सोहळा जवळ आल्याने शासन सोहळ्याबाबत काय निर्णय घेतला जाईल तसेच नियोजन आणि स्वरुप कसे असेल याकडे सर्व वारकरी संप्रदायाचे लक्ष आहे,
संपूर्ण देशात कोरोनाच्या लढाईत शासकीय अधिकारी आणि पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, लोकप्रतिनिधी कार्यरत असलल्याने पालखी सोहळ्याबात दिरंगाई होत आहे त्या पार्श्वभूमीवर आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने दूरचित्रवाणी द्वारे परिषद (Video Conference) घेण्यात आली होती यावेळी पालखी सोहळ्याशी निगडित सर्व घटकांशी चर्चा करून असे मत झाले आहे की पालखी सोहळा रद्द होणार नाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोहळ्यात सहभागी समाजाचे आणि वारकरी यांचे आरोग्य लक्षात घेऊन पालखी सोहळा पारंपरिक पद्धतीने सोहळा साजरा करण्यात येईल शासनाशी चर्चा करून अंतिम निर्णय लवकरात लवकर घेतला जाईल असे संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी सांगितले.