पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री यांना बदनाम करण्यासाठी ; महानिर्मिती परळीचे मुख्यव्यवस्थापक नवनाथ शिंदे व सबंधित अधिकार्‍यांने उचलला विढा

परळी : परळीत विज निर्मिती कंपनीमार्फत स्थानिक लघु उद्योजकांना २५ रूपये टनाची बलाढय उद्योजकांना बेकादेशीर २४२ रूपये टनाने राख विक्री होत आहे.हा प्रकार फक्त बीड जिल्हयाचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना  बदनाम करण्यासाठी महानिर्मिती परळीचे मुख्य व्यवस्थापक नवनाथ शिंदे याच्यासह सबंधित अधिकार्‍याने विढा उचलला असल्याची चर्चा परळीत होत आहे.
परळी महानिर्मितीचे प्रदुषण मोठया प्रमाणात होत असुन परळी शहरातील नजीक असलेल्या गावात  दररोज अन्नासोबत राखेचा आस्वाद घ्यावा लागत आहे.त्याची बोंबाबोंब होवु नये म्हणुन स्थानिक लघु उद्योजकांना ८० टक्के २५ रूपये टनाने राख देण्याचा निर्णय झाला असुन या निर्णयाचा महानिर्मितीचे महाव्यवस्थापक नवनाथ शिंदे सबंधित अधिकारी यांनी संगनमत करून बोगस व बंद पडलेल्या सिमेंट विट भटी धारकांना हाताशी धरून बलाढय असलेल्या उद्योजकांना २५ रूपयाची राख तब्बल २४२ रूपये टनाने  विकली जात आहे.या मोठया घोटाळयामुळे कोटयावधीचा मलिदा फक्त मुख्यव्यवस्थापक व संबंधित अधिकारी मलिदा लाटत आहेत. हा प्रकार लक्षात घेवुन परळीतील एका प्रतिष्ठीत व्यक्तीने दिनांक ६ मे रोजी उपरोक्त प्रकाराबाबत तक्रार दाखल केली होती या तक्रारीची दखल स्थानिक वृत्तपत्राने घेतली आहे. सदरील राखेच्या आफतरातफराबाबत दैनिक जगमित्र ने वृत्त प्रकाशित केले होते.प्रकाशित झालेल्या वृत्ताचे हजारो वाचकाने फेसबुक,वॉटसऍप,पोर्टल, व वृत्तपत्राव्दारे संकलन केले आहे.परळीसह राज्यात एकच राज्यात एकच चर्चा परळीच्या राखेची
तक्रार दाखल हावुनही अद्याप कारवाई नाही.
परळी महानिर्मिती कंपनीमध्ये राखेच्या आफरातफरामध्ये कोटयावधी रूपयांचा घोटाळा झाला असुन या प्रकरणी स्थानिक एका प्रतिष्ठीत व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे.सदरील तक्रारीची कोणतीही दखल घेतली नसुन फक्त मलिदा मिळत असल्यामुळे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना बदनाम करण्याचा विढा उचलला असल्याची चर्चा होत आहेे.
हजारो वाचकाने घेतली दैनिक जगमित्रच्या वृत्ताची दखल..!
परळी महानिर्मिती कंपनीमध्ये कोटयावधी रूपयाच्या  राखेच्या  आफरातफरामध्ये घोटाळा झाला या प्रकरणी दैनिक जगमित्रने सडेतोड पुराव्यासहीत वृत्त प्रकाशित केल्यानंतर वृत्तपत्र,फेसबुक,वॉटसऍप,पोर्टल,आदी माध्यमातुन प्रसिध्द झालेल्या वृत्ताची दखल घेवुन एकच चर्चा  राखेचा घोटाळाच.
 एकच ध्येय पालकमंञ्याची बदनामी !
परळी महानिर्मिती कंपनीचे महाव्यवस्थापक नवनाथ शिंदे व राखे संबंधित असलेले अधिकारी यांचे एकच ध्येय आधी मलिदा लाटा  नंतर पालकमंत्री तथा सामाजिक  न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची बदनामी कशी होईल हा त्यंाचा हेतु असावा त्यामागचे कारण अवघ्या ३ महिन्यातच बीड जिल्हयातील विकास कामांबाबत प्रगती व कोरोनावर मात करण्यासाठी यशस्वी झालेल्या पालकमंञ्यांची बदनामी करण्याचे एकप्रकारे षडयंत्र रचले असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *