पालकमंञ्यांच्या कर्मभुमीत नगरसेवकांची मनमानी ; लोकांच्या दुकानात व घरात पाणी शिरले तर चालेल पण आम्ही काम करणार नाही…
परळी : बीड जिल्हयाचे पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या कर्मभुमीत नगरसेवकांची मनमानी सुरू झाली असुन ही सत्तेची हवाच असावी असे दिसुन येते दरम्यान पावसाचे पाणी लोकांच्या दुकानात किंवा घरात शिरले तर चालेल पण आम्ही काम करणार नाही अशी भुमिका ठाम ठेवुन जनतेला उत्तर मिळत आहे असा आरोप कार्यकर्त्यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे केला आहे
रविवारी सायंकाळी परळी शहरात वादळी पावासासह चांगला पाउस झाला आहे या भागातील नगरसेवक शिंदे व आंधळे यांच्या निष्काळजीपणामुळे गोपाळ टॉकीज समोरील नाल्या साफसफाई न केल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर वाहत लोकांच्या दुकानात व घरात शिरले आहे या प्रकरणी नगरसेवक शिंदे व आंधळे यांना तक्रार केली असता त्यांनी अडमुठीची धोरण राबविले आहे याचा अर्थ सत्तेचा माज चढला असावा असाही आरोप होत आहे