पालकमंञ्यांच्या कर्मभुमीत “भर अब्दुला गुड थैली मे” ; बंद वीटभट्टी ना नाममात्र दरात दिली करोडो रुपयांची कोरडी राख.. !

परळी : परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरातील लघु उद्योगांना (एस.एस.आय) राख विक्री च्या व्यवहारात अधिकारी व राख खरेदीदार वीटभट्टी धारक यांनी अनाधिकृत व अनियमितपणे संयुक्त रित्या शासनाची दिशाभूल करून शासनाला करोडो रुपयांचा चुना लावला आहे तरी दोषींवर त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी एका प्रतिष्ठीत नागरिकानी निवेदनाव्दारे केली आहे.दरम्यान तात्कालीन भाजप-सेनेच्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात सडेतोड विधान परिषदेमध्ये व जनतेमध्ये आवाज उठविला होता त्याच पालकमंञ्याच्या कर्मभुमीत भर अब्दुला गुड थैली,मे या म्हणीप्रमाणे परळी औष्णिक विद्युत केंद्रामध्ये प्रकार सुरू झाला आहे.या प्रकाराकडे पालकमंत्री लक्ष घालतील का असाही प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.
परळी औष्णिक विद्युत केंद्रात वीज निर्मिती साठी दगडी कोळसा वापरला जातो, हा कोळसा जळल्या नंतर निघणारी राख ही ८० कोट्यातून सिमेंट उद्योग,सिमेंट पत्रा उद्योग अशा कंपन्यांना टेंडर किमती प्रमाणे रुपये २४२ व अधिक ५% प्रतिटन एवढ्या भावात देते मात्र स्थानिक लघु उद्योगांना चालना देण्यासाठी शासन नियमाप्रमाणे स्थानिक वीटभट्टी धारकांना नाममात्र दर फक्त २५ रुपये प्रतिटन ने राख दिली जाते,ही राख देतांना प्रति महिना वीटभट्टी किती चालली तिला आलेले वीज बिल व विटा विक्रीचे बिल याचे इन्सपेक्शन करून भट्टीला द्यावयाची राखेची मात्रा ठरवली जाते मात्र येथील अनेक बोगस वीटभट्टी धारक व अधिकारी यांच्या संगनमताने बंद असणार्‍या वीटभट्टी धारकांना सुद्धा बोगस लाईटबील व विक्रीबील दाखवून २०१९-२० मध्ये हजारो टन राख या नाममात्र किमतीत देऊन ती राख वीटभट्टी ला न जाता इतर ठिकाणी चढ्या भावाने विकण्यात आली आहे या मध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून संबंधित दोषी अधिकारी व वीटभट्टी धारक यांच्यावर तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी एका प्रतिष्ठीत नागरिकानी निवेदनाव्दारे केली आहे
लघु उद्योजकांना शुन्य युनिट
परळी औष्णिक विद्युत केंद्राने लघु उद्योजकच्या नावाखाली पाच लघु उद्योजकांना हजारो टनाच्या राखेचा पुरवठा केला आहे परंतु संबंधित लघु उद्योजक लक्ष्मी विट उद्योग,माजेद इंडस्ट्रीज ऍण्ड एंटरप्रायजेस,कोंडीबा फ्लाय ऍश ब्रिक्स ऍण्ड सिमेंट प्रोडक्ट,महाराष्ट्र फ्लाय ऍश ब्रिक्स,शांतीनाथ ब्रिक्स या उद्योगांना वितरण कंपनीने शुन्य विज बिल शुन्य युनिटने देण्यात आले आहे.याचा अर्थ उपरोक्त लघु उद्योजकाने राखेचा गैरवापर केलेला दिसुन येत हे.त्याबाबतचे महावितरणच्या संकेतस्थळावरून प्राप्त झालेले पुरावे छायाचित्रात दिसत आहेत २५ रूपयाची राख २४२ प्रतिटनाने विक्री २०१९-२० मध्ये अनेक विट उद्योगांना औष्णिक विद्युत केंद्राने नाममात्र २५ रुपये दराने राख दिली आहे मात्र त्यातले बहुतांशी वीट उद्योग बंद आहेत, या उद्योगांनी एक ही युनिट वीज वापरली नसतांना त्यांना कोणत्या आधारावर २४२ रुपये प्रतिटन दराची हजारो टन राख फक्त २५ रुपये टन दराने कशी दिली याचा खुलासा थर्मल प्रशासनाने करावा

संबंधित लघुउद्योजक धारकांचे शुन्य युनिट
२०१९-२० मध्ये अनेक विट उद्योगांना औष्णिक विद्युत केंद्राने नाममात्र २५ रुपये दराने राख दिली आहे मात्र त्यातले बहुतांशी वीट उद्योग बंद आहेत, या उद्योगांनी एक ही युनिट वीज वापरली नसतांना त्यांना कोणत्या आधारावर २४२ रुपये प्रतिटन दराची हजारो टन राख फक्त २५ रुपये टन दराने कशी दिली याचा खुलासा थर्मल प्रशासनाने करावा

वरीष्ठांकडे तक्रार…
ऊर्जा मंत्री नितीन राऊत, लाव शैला मॅडम,(व्यवस्थापकीय संचालक महानिर्मित्ती),वाघ साहेब (कार्यकारी संचालक पर्यावरण व सोलार),जाधव साहेब (संचालक खाणकाम ,महानिर्मित्ती),नामदेव शिंदे साहेब (परळी औष्णिक विद्युत केंद्र)यांना या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली असून दोषींवर त्वरीत कार्यवाही करावी अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा एका प्रतिष्ठीत नागरिकानी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *