LatestNewsबीड जिल्हा

पाय घसरून तलावात पडल्याने १७ वर्षीय मुलीचा मृत्यू

धारूर : तालूक्यातील गांवदरा येथील एका १७ वर्षीय मुलीचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी गांवदरा येथे घडली. प्रिती दत्ताञय घुले असे मृत मुलीचे नाव आहे. सकाळी गावालगतच्या तलावावर कपडे धुण्यासाठी गेल्यानंतर पाय घसरून पाण्यात पडल्याने ही दुर्दैवी घटना घडली. प्रीती अभ्यासात अत्यंत हुशार असल्याने तिच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

अधिक माहिती अशी कि, गांवदरा येथील प्रिती घुले ही बारावी वर्गात होती. गुरूवारी सकाळी प्रीती गावालगतच्या तलावावर कपडे धुण्यासाठी गेली होती. यावेळी पाय घसरल्याने ती तलावात पडून बुडाली. याची माहिती मिळाली असता ग्रामस्थांनी तलावाकडे धाव घेत तिला पाण्यातून बाहेर काढून धारूर येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. 

टिप- बातमीत वापरलेला फोटो प्रतिकात्मक आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *