पाथरीत थायलेसिमियाग्रस्त विध्यार्थ्यासाठी रक्तदान शिबीर संपन्न. -शिक्षक,पालक,कार्यालयीन कर्मचारी,इतर विभागातील कर्मचाऱ्यांचा सहभाग.
पाथरी(आवडाजी ढवळे): जिल्हा परिषद परभणी अंतर्गत समग्र शिक्षा अभियान,समावेशित शिक्षण विभाग गटसाधन केंद्र पाथरी येथे २०/८/२०२० रोजी भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले. या मध्ये गटातील शिक्षक, पालक,कार्यालयीन कर्मचारी,व इतर मित्र परिवारातील सदस्य असे एकूण ४४ जणांनी रक्तदान केले.यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ.अनिल खोकले,डॉ.सुहास देशमुख,डॉ प्रतिक,डॉ. प्रीतम,राजेश,दीपक व मारोती यांच्या टीम ने योगदान दिले.प्रसंगी गटाचे गटशिक्षणाधिकारी मुकेश राठोड हे उपस्थित होते. समावेशित शिक्षण अंतर्गत अपंगत्वाच्या २१ प्रकारांपैकी एक प्रकार म्हणजे थैलेसिमिया. या आजारावरती आजपर्यंत तरी कोणतीही उपचार पद्धती कार्यरत नाही.यावरती एकच उपाय तो म्हणजे या आजाराने ग्रस्त विध्यार्थ्यांना रक्तचढवून त्यांचे जीवन मान उंचावणे.हे आजार जेव्हा प्रशासनाच्या लक्षात आले तेव्हा तात्काळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पृथ्वीराज साहेब,जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी श्रीमती डॉक्टर पाटेकर मॅडम यांनी सर्वजिल्हा समन्वयक,विशेष तज्ञ व विशेष शिक्षकांना रक्तदान शिबिर घेण्याचे आवाहन केले. मा.मुख्यकार्यकारी अधिकारी व शिक्षानाधिकारी प्राथ.यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक तालुक्याला दिव्यांग विद्यार्थ्यांना आपले सर्वस्व माणून आज पर्यंत सेवा करणारे,विशेष शिक्षक विशेष तज्ञांनी लागलीच कामाला लागले. त्याचा प्रत्यय आज समावेशित शिक्षण विभाग पाथरी तालुक्यात पहावयास मिळाले. कोरोना महामारी संपूर्ण जगभरात असताना रक्तदानाचे आवाहन करणे किंवा रक्तदान करणे हि गोष्ट जरा जिकीरीचेच होते. पण केल्याने होत आहे रे, आधी केले पाहिजे !! या म्हणी नुसार तालुक्याचे विशेष तज्ञ संपत राऊत मल्लिकार्जुन देवरे हनमंत निवळे,माधव गायकवाड, श्रावण वैरागड यांच्या एकत्र प्रयत्नाने त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून गटातील आपल्या कार्यक्षेत्र येणारे शिक्षक,पालक यांना नियमित व्हाट्सअपद्वारे दररोज विनंती पर संदेश पाठवून, प्रत्यक्ष फोने द्वारे संपर्क करून रक्तदान करण्याचे आवाहन केले. या शिबीरा मध्ये ४० रक्तदात्यांनी सहभाग घेतला.सदर शिबिराला तालुका वैद्यकीय अधिकारी श्री वाघ व जोगदंड आर एम यांनी भेट देवून शुभेच्छा दिल्या तर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका अध्यक्ष या नात्याने हरिदास कावळे यांनी ही आपले सहकारी शिक्षकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते,त्याला हि शिक्षकांनी भर भरून प्रतिसाद दिले.रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी जिल्हा समन्वयक बि.जी.भवर,वसीम अबरार खान यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. रक्तदान शिबिराच्या यशस्वितेसाठी संपत राऊत, हनमंत निवळे,मल्लिकार्जुन देवरे,माधव गायकवाड,श्रावण वैरागड,दीपक रणदिवे,रखमाजी कावळे,दिगंबर गिरी,नितीन आळसे,डेम्बरे,संतोष काटकर,विजय भुजबळ आधी यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मल्लिकार्जुन देवरे यांनी केले तर संपत राऊत यांनी आभार मानले आसुन सदर शिबीरा मध्ये पाथरी तालुक्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आसी माहीती तालुका शिक्षन अधीकारी राठोड यांनी दिली