पाणीपुरवठा समितीची बैठक संपन्न!

बीड : नगरपालिका पाणीपुरवठा समितीची बैठक सभापती सय्यद इलियास यांच्या कक्षात संपन्न झाली. यामध्ये पाणी पुरवठा विभाग अंतर्गत अंदाजपत्रके तयार करणे नगरसेवक व पाणीपुरवठा समिती सदस्यांच्या मागणीनुसार आवश्यक ती कामे करण्याबाबत चर्चा करण्यात आली सदरील बैठक पाणीपुरवठा सभापती सय्यद इलियास तसेच उप अभियंता पाणी पुरवठा यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली.
शहरात बंद असलेले हातपंप दुरुस्त करणे, अनाधिकृत नळ जोडणी यांचा शोध घेणे, आगामी उन्हाळ्यातील संदर्भात पाण्याचे नियोजन करणे, सार्वजनिक हातपंप यांची दुरुस्ती करणे, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, आदी विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली शहरातील पिण्याच्या पाण्याची टाकी यांना कलर देणे रंगरंगोटी करणे पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना विशिष्ट गणवेश हॅन्ड ग्लोज बूट पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून विशेष सिम्बॉल लावणे याचा कामाच्या वेळी गणवेशावर असणे बंधनकारक करण्यात आले आहे सदर बैठक नगरपालिकेत सभापती सय्यद इलियास नगरसेवक शुभम धूत पाणीपुरवठा उप अभियंता यासह समितीचे सदस्य तसेच नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये पार पडली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *