पाणीपुरवठा सभापती सय्यद इलियास यांचा मुहम्मदिया कॉलणीतील नागरिकांच्या हस्ते सत्कार!
बीड : नव नियुक्त पाणीपुरवठा सभापती सय्यद इलयास हमीद यांनी मोहम्मदिया कॉलोणी मध्ये भेट दिली असता परिसरातील नागरिकांनी त्यांचा सत्कार केला, यावेळी मोहम्मद कॉलनी तील युवा नेते सय्यद इलयास यांनी सभापती चे आभार मानले व मुहम्मदिया कॉलनीतील मूलभूत समस्या नवनिर्वाचित पाणीपुरवठा सभापती न. प. बीड यांच्यापुढे मांडले,
बीड शहरातील मुहम्मदिया कॉलणीत लोकांकडून नवीन पाणी पुरवठा सभापती व नगरसेवक सय्यद इलयास इलयास यांच्या सत्तकार करुन मुहम्मदिया कॉलणीत नागरिकांनी आपल्या समस्या नवनिर्वाचित पाणीपुरवठा सभापती यांच्यापुढे मांडले।
अनेक दिवसापासून मोहम्मदिया कॉलनी परिसरातील पाणीचे प्रश्नावर मा. जिल्हाअधिकारी साहेब यांना अनेक निवेदने दिले होते. या निवेदनाची दखल जिल्हाधिकारी साहेबांनी घेतली, बीड न. प. यांना नोटीस पाठविण्यात आली व अमृत पयजल योजना लाभ या परिसरातील नागरिकांना तात्काळ देण्यात यावे मा जिल्हा अधिकारी साहेबांनी आदेश दिले आहे याची दखल घेऊन न.पा. मुख्याधिकारी साहेबांनी पाणीपुरवठा सभापती यांना आदेश दिले तात्काळ मोहम्मदिया कॉलणी परिसरातील नागरिकांच्या पिण्याचे पाणीचा प्रश्न सोडविण्यात यावे यावेळी परिसरातील नागरिकांची उपस्थिती एम आय एम चे युवा नेते सय्यद इलयास, राजा फिटर, शेख युनूस भाई, नौशाद कुरेशी, जावेद भाई मोमीन, सलीम भाई कुरेशी, नवीद मोमीन, अासेफ कुरेशी, शेख मन्सूर व परिसरातील सर्व नागरिक उपस्थित होते