पाटोदा,केज,आष्टी तालुक्यातील तीन गावात कंटेनमेंट झोन शिथिल !!
पाटोदा : तालुक्यातील बेनसुर, केज तालुक्यातील केकान वाडी आणि आष्टी तालुक्यातील देवी निमगाव या ३ गावातील प्रतिबंध शिथील करण्यात येत असून परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिले आहेत.
या ठिकाणी प्रतिबंधात्मक कार्यक्षेत्रामध्ये मागील १४ दिवसात एकही कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आला नाही असे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद,बीड यांनी कळविले आहे.
पाटोदा तालुक्यातील बेनसुर, केज तालुक्यातील केकान वाडी आणि आष्टी तालुक्यातील देवी निमगाव या गावातील असलेले कन्टेनमेंट झोन (Containment zone) शिथील करण्यात आले आहे
या ठिकाणी परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे असे आदेश दिले आहेत.
बीड जिल्हयात फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम १४४(१) (३) अन्वये दिनांक ३१ जुलै २०२० रोजीचे रात्री १२.०० वा. पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत, सदर आदेश या आदेशासह अंमलात राहतील.