Newsनांदेड

पवना येथील आरोग्य उप केंद्र 4 वर्षा पासून कुलुप बंद…!

नांदेड / शेख इस्माईल : हिमायतनगर तालुक्यातील कोरोणा संक्रमणाच्या काळात अती दुर्गम भागातील असलेले प्रा.आ.केंद्र.सरसम अंतर्गत पवना येथील प्राथमिक ऊप आरोग्य केंद्र चार वर्षापासुन बंद असल्याची तक्रार येथील राजकुमार दगडु राऊत यांनी जिल्हा अधिकारी नांदेड यांच्या सह तहसीलदार हिमायतनगर .ता. आरोग्य अधिकारी हिमायतनगर, जिल्हा आरोग्य अधिकारी जी प नांदेड यांच्याकडे २०.६.२०१९रोजी प्रा.आ.ऊप केंद्र पवना बंद असल्याची तक्रारीत राऊत यांनी सांगितले की
प्रा.आ.ऊप केंद्रातील तीन वर्षा पूर्वी ए.एन.एम. पदावर कार्यरत असलेल्या दोन्ही महिलांच्या बदल्या झाल्या नंतर ७मार्च२०१७रोजी लता ऊल्हास पवार ह्या पालघर येथुन जिल्हा बदली ७ मार्च २०१७ उपकेंद्र पवना येथे यांची नेमणूक झाल्याचे आदेश काढले असुन या पवना उपकेंद्रावर हजर नसल्याने पवना उपकेंद्र बंद आहे
प्रा.आ.उपकेंद्र पवना आरोग्य सेवीका मूख्यालयाच्या ठिकाणी हजर राहात नसल्याचा ग्रांमपच्यायत चा ठराव तालुका आरोग्य अधिकारी हिमायतनगर यांना सुद्धा दिला असुन कोणतिही कारवाई आज पर्यंत झाली नाही हे एक कोडेच आहे

आरोग्य सेविका नसल्याने पवना उपकेंद्र चार वर्षांपासून बंद असल्याने या उपकेंद्रा अंतर्गत १०ते१२गावे असुन अती दुर्गम भागातील जनतेच्या आरोग्याशी खेळ चालू आहे
श्रीमती लता ऊल्हास पवार यांनी या केंद्रांवर हजर झाल्या नसल्याचे प्रा.आ.केंद्र सरसम येथुन कारभार कागदोपत्री चालु असल्याचे चार वर्षात फक्त डब्लु एच ओ च्या कार्यक्रमाचे एकच दिवस आल्याचे राज कुमार दगडू राऊत यांनी सांगितले आमचे नांदेड जिल्हा प्रतिनिधीशी बोलताना सांगितले
पंधरा दिवसांत लता उल्हास पवार कार्यालयाचे ठिकाणी हजर झाल्या नसल्यास पुर्व सुचना न देता उपोषणास बसणार असल्याचे राज कुमार राऊत यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *