परळी तालुक्यातील 90 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी 8 तारखेला आरक्षण सोडत
परळी वैजनाथ : परळी तालुक्यातील 90 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून सरपंच पदाचे आरक्षण सोडत मंगळवार दि .8 डिसेंबर 2020 रोजी परळी तहसील कार्यालयात दुपारी 3 वा. होणार असल्याची माहिती नायब तहसीलदार बी. एल. रुपनर यांनी दिली आहे. या बाबत प्राप्त माहिती अशी की, परळी तालुक्यात 90 ग्रामपंचायतींच्या सन 2020 ते 2025 या पाच वर्षासाठी सरपंच पदाचे आरक्षण सोडत करण्यात येणार आहे. यात प्रवर्ग निहाय आरक्षित जागा पुढीलप्रमाणे:- 1)अनुसूचित जाती सरपंच पदासाठी आरक्षित पदे 15 असून यात महिला 7 तर पुरुष 8, 2)अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित पद 01, यात पुरुष 01, 3)नागरिकाचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित पदे 24 असून यात महिला 12 तर पुरुष 12, 4)खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित पदे 50 असून महिला 25 व पुरुष 25 जागा आहेत. या पद्धतीने तालुक्यातील 90ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत होणार आहे. जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने मंगळवार दि. 8 रोजी दुपारी 3 वाजता तहसील कार्यालयाच्या सभागृहात हा सोडतीचा कार्यक्रम उपविभागीय अधिकारी परळी श्रीमती.नम्रता चाटे, तहसीलदार डॉ. विपीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीचे गांभीर्य ओळखून तोंडावर मास्क, सॅनिटायझर अन् फिजिकल डिस्टन्स ठेऊन नागरिकांनी उपस्थितीत राहण्याचे आवाहन तहसीलदार डॉ. विपीन पाटील यांनी केले आहे