परळी तालुका समन्वय पुनर्विलोकन समितीच्या अध्यक्षपदी सूर्यभान नाना मुंडे…!

सदस्यांमध्ये तुळशीरा पवार, शरद राडकर, सौ. अर्चना रोडे सह अनेकांचा समावेश

परळी : परळीचे आमदार तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार परळी तालुक्यात एकात्मिक विकासासाठी समन्वय व पुनर्विलोकन समिती स्थापन करण्यात आली असून या समितीच्या अध्यक्षपदी परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तळेगाव येथील श्री. सूर्यभान नाना मुंडे यांची तर निवड करण्यात आली आहे.

बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी याबाबतचा निर्णय जारी केला असून परळीचे तहसीलदार हे या समितीचे शासकीय सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.

राज्य शासनाच्या वतीने ग्रामीण भागाचा सर्वांगीण व व्यापक विकास घडून यावा या हेतूने तसेच समाजातील अविकसित स्तराच्या विकासावर भर देता यावा या प्रमुख उद्दिष्टाने अनेक सामाजिक व आर्थिक कार्यक्रम हाती घेतले जातात. या कार्यक्रमांची यशस्वी अंमलबजावणी व्हावी यासाठी तालुका स्तरावर ही समन्वय व पुनर्विलोकन समिती स्थापन करण्यात येते.

परळी तालुक्यात स्थापन करण्यात आलेल्या या समितीमध्ये अध्यक्ष म्हणून श्री. सूर्यभान मुंडे, सदस्य म्हणून आ. संजय भाऊ दौंड, सहअध्यक्ष पं.स.सभापती सौ. उर्मिला गित्ते, सदस्य म्हणून खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष श्री. विकास नागरगोजे, तसेच अशासकीय सदस्य म्हणून मिरवट येथील श्री. तुळशीराम पवार, गाडेपिंपळगाव येथील श्री. शरद राडकर, नागापूर येथील श्री. कृष्णा तेलंग, गंगासागर नगर, परळी येथील श्री. संतोष चौधरी, भीमवाडी परळी येथील श्रीमती अर्चना रोडे, गोवर्धन येथील श्रीमती भाग्यश्री संजय जाधव आणि सिरसाळा येथील श्रीमती कुशावर्ताबाई काळे यांचा समावेश करण्यात आला आहे.

या समितीचे अध्यक्ष सूर्यभान मुंडे तसेच सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी ना. धनंजय मुंडे यांचे आभार व्यक्त केले असून येणाऱ्या काळात परळी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी ना. मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही समिती पूर्ण क्षमतेने योगदान देईल असे आश्वस्त केले आहे.

सूर्यभान नाना मुंडे हे पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब यांचे अतिशय विश्वासु जवळचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात सध्या ते परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक असून यापूर्वी त्यांनी एक वर्ष मार्केट कमिटीचे सभापती पदही भूषविले आहे. तळेगावचे ते अनेक वर्षे ते सरपंचही होते. परळी बाजारपेठेत एक मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व म्हणून ते ओळखले जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *