परळी तालुका कॉंग्रेसच्या वतीने शहिद जवानांना भावपुर्ण श्रध्दांजली – अॅड.अनिल मुंडे
परळी : परळी तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने शहिद जवानांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या आदेशानुसार परळी येथे कॉंग्रेस कमिटीच्या वतीने नेहरू चौक (तळ)शोकसभेचे आयोजन करून या सभेमध्ये शहिद झालेल्या जवानांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी कॉंग्रसचे तालुकाध्यक्ष ऍड.अनिल मुंडे,माजी शहराध्यक्ष प्रकाशराव देशमुख,कॉंग्रेसचे प्रवक्ते विजयप्रसाद अवस्थी,सुभाषराव देशमुख ,ऍड.डी.पी.कडबाने,रामराजे देशमुख,लक्ष्मण नागेश,रामकिशन देशमुख,भारत ठाकुर,राहुल देशमुख, सखाराम फकीरे,जगताप,नागनाथ कुंबळे,अरून देशमुख,राजेश देशमुख,यांच्यासह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.