Uncategorized

*परळी झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी ६००० घरकुले बांधणार – धनंजय मुंडेंचा संकल्प* *पंतप्रधान आवास योजनेतील ४०६ लाभार्थींना तसेच पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर स्वनिधीचे २५ लाभार्थींना धनादेश वितरित*

परळी (दि. १०) —- : परळी शहर झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी परळीत बारामती पॅटर्न राबवून सर्वांसाठी घरे योजनेतून ६००० घरकुले बांधण्याचा आपला संकल्प असून, निवडणुकीत दिलेल्या प्रत्येक वचनावर आपण ठाम असल्याचे व त्यांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे परळीचे आमदार तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते परळी शहरातील पंतप्रधान आवास योजनेतील ४०६ लाभार्थींना पहिल्या टप्प्यातील प्रत्येकी ४० हजार रुपये रक्कमेचे धनादेश वितरित करण्यात आले, तसेच पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर स्वनिधी योजनेनंतर्गत २५ लाभार्थींना प्रत्येकी १० हजार रुपयांच्या मदतनिधीचे वितरण करण्यात आले. परळी तालुक्याची जलसंजीवनी असलेल्या वाण प्रकल्पाचे नुकतेच भूमिपूजन झाले, जायकवाडी धरणाचे पाणी वाण प्रकल्पासाठी आरक्षित करून परळी शहराचा व तालुक्याचा पाणी प्रश्न कायमचा मिटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परळी टँकर मुक्त होऊन नागरिकांना २४ तास पाणी मिळावे यासाठी काही उपाययोजना केल्या असून येत्या काही दिवसात दररोज पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल. कोरोनाने लोकांना घरात राहायला भाग पाडले, या काळात स्वतःचे घर असणे किती गरजेचे आहे, याची जाणीव प्रत्येकाला झाली. या जाणिवेतूनच महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड च्या माध्यमातून सर्वांसाठी घरे योजना राबवून, वेळ पडल्यास नागरिकांना काही दिवस ट्रान्झिट कॅम्प मध्ये राहण्याची व्यवस्था करून, पक्की घरे बांधून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असून, परळी शहर झोपडपट्टी मुक्त करण्याचा माझा निर्धार असल्याचे ना. मुंडे यावेळी बोलताना म्हणाले. या कार्यक्रमास विधान परिषद सदस्य आ. संजय दौंड, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, नगराध्यक्षा सौ. सरोजिनीताई हालगे, उपनगराध्यक्ष अ. शकील कुरेशी, न.प. गटनेते वाल्मिक अण्णा कराड, बाजीराव भैय्या धर्माधिकारी, शरद मुंडे, दीपक नाना देशमुख, चंदूलाल बियाणी, महादेव रोडे, भावड्या कराड, अनिल अष्टेकर, गोपाळकृष्ण आंधळे, चेतन सौंदळे, राजेंद्र सोनी, उपसभापती पिंटू मुंडे, सूर्यभान मुंडे, अय्युब खान पठाण, जाबेरखान पठाण, राजा खान पठाण, नितीन कुलकर्णी, वैजनाथ सोळंके, प्रा. विनोद जगतकर, नितीन रोडे, तहसीलदार विपीन पाटील, न.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद मुंडे यांसह आदी मान्यवर उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीत परळीच्या जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध असून, कोरोना मुळे लागलेले आर्थिक निर्बंध जसजशे कमी होतील तसतशी विविध विकासकामे हाती घेऊन ती पूर्णत्वाकडे नेण्यात येतील, असे यावेळी बोलताना ना. मुंडे म्हणाले. बायपास चे आता भूमिपूजन नाही, थेट काम सुरूच करणार परळी शहर बायपासचे मागील पाच वर्षात अनेकवेळा केवळ भूमिपूजन झाले, प्रत्यक्ष कामाला मात्र सुरुवात झालीच नाही, आपण बायपास ला निधी मंजूर झाला, त्याची टेंडर प्रक्रिया पूर्ण करून घेतली; आता भूमिपूजन नाही थेट काम सुरू करून दाखवणार आहे, असेही यावेळी बोलताना ना. मुंडे म्हणाले. शहरात नालीमुक्त रस्ते करण्यासाठी खोदकाम केल्याने थोडे दिवस त्रास शहरात नालीमुक्त रस्ते करण्यासाठी भुयारी गटार योजना राबविण्यात येत असून, यामुळे काही भागात रस्ते खोदलेले आहेत, एखादे मोठे विकासकाम हाती घेतले तर ते पूर्ण होईपर्यंत नागरिकांना थोडा त्रास सहन करावा लागतो, परळी करांनी थोडे दिवस हा त्रास सहन करावा, शहरातील रस्ते आधी होते त्यापेक्षा आणखी चांगले करून देण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध आहे असेही ना. मुंडे म्हणाले. दरम्यान परळी शहरातील विविध भागातील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत १३५७ प्रस्ताव मंजूर झाले असून त्यांपैकी ४०६ लाभार्थींना आज प्रत्येकी ४० हजार रुपये रकमेचे धनादेश तसेच पथविक्रेता आत्मनिर्भर स्वनिधी योजने अंतर्गत ६४० पथविक्रेत्यांना प्रत्येकी १० हजार रुपये मदतनिधी मंजूर करण्यात आला असून, त्यांपैकी २५ लाभार्थींना प्रत्यक्ष धनादेशाचे प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. मराठवाड्यातले सर्वात मोठे नाट्यगृह परळीत उभारणार इरिगेशन कॉलनीची जमीन नगर परिषदेला घेऊन, त्या ठिकाणी मराठवाड्यातील सर्वात मोठे नाट्यगृह उभारणार असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. यावेळी ८० मेगावाट क्षमतेचा आणखी एक सौर ऊर्जा प्रकल्प येत्या काही दिवसातच उभारण्यात येईल तसेच क्रीडासंकुल बाबतही लवकरच निर्णय होईल असेही ना. मुंडे म्हणाले. धनंजय मुंडे म्हणजे नाविन्यपूर्ण विकासाची दृष्टी असलेले नेतृत्व – जिल्हाधिकारी राहुल रेखावार बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे म्हणजे विकासकामे करण्याची नाविन्य पूर्ण दृष्टी असलेले नेतृत्व असून, त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध क्षेत्रात मोठी विकासकामे करण्यात येत आहेत. जिल्हा आरोग्य यंत्रणेला ना. मुंडे यांनी दिलेले पाठबळ हे नक्कीच वाखाणण्याजोगे असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी अधोरेखित केले. यावेळी त्यांनी दोन्हीही योजनेतील सर्व लाभार्थींचे अभिनंदन करत घरकुल सह अन्य योजनांमधून घर बांधण्यासाठी निधी व जागा उपलब्ध करण्याबाबतची माहिती उपस्थितांना सांगितली. संचलन गोविंद महाराज केंद्रे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *